शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जनआक्रोश समितीचे लाक्षणिक उपोषण : महिलांचा सहभागही लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:54 IST

येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त असलेली पदे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊनसुद्धा आर्थिक निधीची तरतूद करण्याकडे राजकीय नेते

ठळक मुद्देराजकीय पुढाºयांच्या निषेधार्थ काळे झेंडे बांधले

दोडामार्ग :  येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त असलेली पदे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊनसुद्धा आर्थिक निधीची तरतूद करण्याकडे राजकीय नेते मंडळींनी केलेले दुर्लक्ष आदी  कारणांमुळे सोमवारी आरोग्याचा जनआक्रोश समितीच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी राजकीय पुढाºयांच्या निषेधार्थ काळे झेंडे बांधण्यात आले.

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला सन २०१३ मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर काम सुरू करण्याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जनआक्रोश  आंदोलनावेळी आर्थिक निधीची तरतूद करण्याचे आश्वासन सत्ताधाºयांकडून देण्यात आले होते. शिवाय दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात करारावर कंत्राटी स्वरूपात नेमलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयांची पदे त्यांचा करार संपण्याअगोदर भरली जातील, अशी आश्वासने देण्यात आली होती.

प्रत्यक्षात मात्र उपजिल्हा रुग्णालयासाठी निधीची आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. तसेच कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांचा करार संपल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त झाल्याने रुग्णसेवेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. 

तालुक्याच्या वैद्यकीय सेवेवर निर्माण झालेल्या या प्रश्नावर राजकीय नेते मंडळींनी कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ काळे झेंडे बांधून सोमवारी आरोग्याचा जनआक्रोश समितीच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात महिलांचा सहभागही उल्लेखनीय होता. तोडगा न निघाल्याने हे उपोषण उशिरापर्यंत सुरू होते.दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याबाबत जनआक्रोश समितीतर्फे येथील ग्रामीण रुग्णालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गStrikeसंप