शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शाळांमधील २०१२ नंतरची भरती धोक्यात!

By admin | Updated: November 17, 2016 00:27 IST

हजारो शिक्षकांवर गंडांतर? : दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारीचा निर्णय

सागर पाटील-- टेंभ्ये --माध्यमिक शाळांमध्ये २ मे २०१२ नंतर करण्यात आलेली शिक्षक भरती धोक्यात आली आहे. सन २०१२ ते २०१६ या कालावधीत रीतसर परवानगी न घेता अनेक ठिकाणी पदभरती करण्यात आल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही पदांना मान्यताही देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या मान्यतांची पुनर्तपासणी शासनस्तरावरून करून यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व आवश्यकता वाटल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.राज्यातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के समायोजनासाठी राज्य शासनाने २ मे २०१२ रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन झाल्याशिवाय कोणत्याही पदभरतीस मान्यता देण्यात येणार नसल्याचे त्यात स्पष्ट केले होते. म्हणजेच एका अर्थाने राज्यातील शिक्षक भरतीवरील ही बंदीच होती. राज्यात रिक्त जागांचे प्रमाण वाढल्याने व काही महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांची कमतरत निर्माण झाल्याने शासन स्तरावरून २०१२ च्या शासन निर्णयात २०१४ मध्ये अंशत: बदल करण्यात आला. यासंदर्भातील एका याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ जून २०१६ रोजी निर्णय दिला आहे. शिक्षण उपसंचालकांनी, शिक्षणाधिकारी यांनी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध नसल्याचे प्रमाणित केल्याशिवाय पदभरती करण्यात येऊ नये, तसेच नाहरकत प्रमाणपत्राशिवाय पदभरती केलेल्या पदांना वैयक्तिक मान्यता देण्यात येऊ नये, असे या खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. तसेच मान्यता प्राप्त न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधित व्यवस्थापनाने अदा करावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.न्यायालयाच्या या आदेशाला अनुसरून मे २०१२ नंतर ना हरकत प्रमाणपत्राशिवाय करण्यात आलेल्या पदभरतीस कोणत्याही परिस्थितीत मान्यता देण्यात येऊ नये व मान्यता दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई व आवश्यक वाटल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील अध्यादेशही जारी केला आहे. यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.नियम डावलून पदभरती : २०१४ मधील शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शाळेत शिक्षक भरतीसाठी समिती निर्माण करण्यात आली होती. शिक्षण संस्थांनी शिक्षण विभागाकडून रीतसर परवानगी घेतल्यानंतर या समितीच्या माध्यमातून भरती करणे अपेक्षित होते, परंतु काही शिक्षण संस्थांनी हे सर्व नियम बाजूला सारून शिक्षक भरती केली असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष बाब म्हणजे शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालक स्तरावरून काही पदांना मान्यताही देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.