शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राच्या उधाणाचा मालवणला फटका

By admin | Updated: July 16, 2014 23:15 IST

मालवण दांडी ते देवबागपर्यंतच्या किनारपट्टीवर नागरिकांचे मोठे नुकसान

मालवण : अरबी समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका बुधवारी मालवण किनारपट्टीला बसला. बुधवारी दुपारी आलेल्या समुद्राच्या भरतीवेळी अजस्त्र लाटांचे तांडव किनारपट्टीवर पहावयास मिळाले. सततच्या लाटांच्या धडाक्याने मालवण दांडी ते देवबागपर्यंतच्या किनारपट्टीवर नागरिकांचे मोठे नुकसान झाले. लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्याचीही मोठी धूप झाली.सततचा पाऊस आणि सागरी उधाणामुळे मालवण किनारपट्टीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी समुद्राच्या लाटा लोकवस्तीत शिरल्या होत्या. दांडी येथे समुद्राच्या उधाणामुळे सुभाष केळुस्कर यांचे चार माड जमीनदोस्त झाले. विजय बांदेकर यांचा एक माड, प्रभाकर पराडकर यांचे दोन माड, सागरी अतिक्रमणामुळे कोसळले. तसेच दांडी येथीलच सुहास खराडे यांच्या दगडी कंपाऊंडचे नुकसान झाले. कुंपणात समुद्राचे पाणी शिरल्याने जमिनीची मोठी धूप झाली. किनारपट्टीवर बंधाऱ्याची मागणीसततच्या लाटांच्या माऱ्यामुळे दांडी चौकचार मंदिराजवळील संरक्षक भिंत उखडली गेली. उधाणामुळे मोरेश्वर मंदिर ते दांडेश्वर मंदिरापर्यंतच्या किनाऱ्याची मोठी धूप झाली. २० ते २५ फुटांपर्यंत समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. किनारपट्टीची मोठी धूप होत असल्यामुळे मालवण किनारपट्टीवर बंधारा किंवा रिंग रोड व्हावा, अशी मागणी पुन्हा एकदा मच्छिमारांमधून होत आहे.मालवण गवंडीवाडा येथे वीजवाहिन्या तुटून झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे १२ ते १५ घरांतील विजेची उपकरणे जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुधवारी दुपारी वीजवाहिन्या तुटून शॉर्टसर्कीट झाले. यामुळे या परिसरातील १२ ते १५ नागरिकांच्या घरातील टिव्ही, रेफ्रीजरेटर यांसह विद्युत उपकरणे जळाली. पावसामुळे शहरातील कोतेवाडा भागातील संगीता मयेकर यांच्या घराचे छप्पर कोसळल्याने त्यांचे ४८ हजारांचे नुकसान झाले. वायरी भूतनाथ येथेही मंगेश झाड यांच्या घरावर व बाजूच्या शेडवर माडाचे झाड पडल्याने घराचे अंशत: ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठी मालवणकर यांनी केला. (प्रतिनिधी)