शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

कोंबड्यांच्या शोधार्थ बिबट्या घुसला घरात

By admin | Updated: July 19, 2015 23:36 IST

वनविभागाने केले जेरबंद : तळकट परिसरात खळबळ

कसई दोडामार्ग : तळकट कट्टा येथील नारायण जानबा देसाई यांच्या घराला लागून असलेल्या पडवीमध्ये शनिवारी रात्री बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. बिबट्याने देसाई यांच्या कोंबड्यांचा फडशा पाडला. देसाई यांनी प्रसंगावधान राखत हलक्या पावलाने जात बिबट्या घुसलेल्या पडवीचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा तळकट वनबागेतून पिंजरा आणून ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्यास जेरबंद केले व तिलारीच्या जंगलात सोडून दिले. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना बिबट्या तळकट-कोलझर जंगलातून भरवस्तीत घुसला. नारायण देसाई यांच्या घराला लागून असलेल्या पडवीमध्ये कोंबड्या होत्या, तर बाजूच्या गोठ्यात म्हशी बांधल्या होत्या. बिबट्याने पडवीच्या दरवाजातून घुसून वीस कोंबड्या फस्त केल्या. दरम्यान, कोंबड्या मोठमोठ्याने ओरडू लागल्याने नारायण देसाई खडबडून जागे झाले. पडवीच्या दिशेने जाताच त्यांना बिबट्या कोंबड्यांवर ताव मारीत असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून भयभीत झालेल्या देसाई यांचा क्षणभर गोंधळ उडाला. घरात त्यांची पत्नी आणि मुले, तर आजूबाजूलाही लागूनच घरे असल्याने त्यांनी प्र्रसंगावधान राखत हलक्या पावलाने पडवीचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावली. त्यानंतर देसाई यांनी आजूबाजूच्या लोकांना जागे करून त्यांना सर्व प्रकार सांगितला. सर्व ग्रामस्थ त्यांच्या पडवीकडे जमा झाले. देसाई यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाचे कर्मचारी तळकट वनबागेत असलेला पिंजरा घेऊन आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. तब्बल दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी, ग्रामस्थ दीपक देसाई, अर्जुन देसाई, प्रमोद देसाई, विष्णू देसाई, रमाकांत गवस तसेच अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला पकडण्यास वनविभागाला शक्य झाले. यावेळी चंद्रकांत खडपकर, विनोद मयेकर, विलास साळगावकर, प्रकाश गवस, तात्या रेडकर, आदी वनकर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)वनविभागाचे कर्मचारी धारेवर रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी महादेव नाईक घटनास्थळी दाखल झाले, तर अन्य कर्मचारी रात्री दोन वाजता घटनास्थळी आले, परंतु बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणि अन्य साहित्य न घेताच आल्याने उपस्थित ग्रामस्थ आणि पोलिसांनी वन कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईबाबत त्यांना धारेवर धरले.