शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोळपे येथे सागाचे लाकूड जप्त; कारवाईमुळे व्यावसायिकांना धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:25 IST

विनापरवाना तोडलेले सागाचे दीड लाखाचे बेवारस लाकूड कोळपे येथील आरा गिरणीवर(साॅ मील) वन विभागाने जप्त केले. याप्रकरणी अज्ञात लाकूड व्यावसायिकाविरुद्ध वनाधिका-यांनी गुन्हा नोंदवला आहे. चौकशी दरम्यान आरा गिरण मालकाने कोळपेतील एका व्यक्तीचे नाव उघड केले आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील लाकूड व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

वैभववाडी(सिंधुदुर्ग): विनापरवाना तोडलेले सागाचे दीड लाखाचे बेवारस लाकूड कोळपे येथील आरा गिरणीवर(साॅ मील) वन विभागाने जप्त केले. याप्रकरणी अज्ञात लाकूड व्यावसायिकाविरुद्ध वनाधिका-यांनी गुन्हा नोंदवला आहे. चौकशी दरम्यान आरा गिरण मालकाने कोळपेतील एका व्यक्तीचे नाव उघड केले आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील लाकूड व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.    विभागीय वन अधिकारी प्रकाश बागेवाडी(कोल्हापूर), वनपाल चंद्रकांत देशमुख प्रकाश पाटील हे कोळपे तिथवली परिसरात फिरतीवर असताना त्यांना कोळपेतील आरा गिरणीवर सागाचे बेवारस लाकूड आढळून आले. लाकूड जप्त करीत गुन्हा अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्या लाकडाबाबत अधिका-यांनी आरा गिरण मालकाकडे चौकशी केली असता गिरण मालकाने तेथील जब्बार पाटणकर याने लाकूड आणून टाकल्याचे, वनाधिका-यांना सांगितले.     वन अधिका-यांनी सागाच्या लाकडाचे 98 नग(साडेसात घनमीटर) जप्त केले. त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. जप्त केलेले लाकूड गिरण मालकाच्या ताब्यात दिले आहे. वन विभागाने आकस्मिक धाड टाकून केलेल्या कारवाईमुळे लाकूड व्यावसायिकांचे धाबे दणाणले  असून ही कारवाई चोरट्या लाकूड तोडीला आळा घालणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दोन जागी लाकूड पकडल्याची चर्चा

    वनखात्याच्या अधिका-यांनी कोळपेतील आरा गिरणीवर सागाचे साडेसात घनमीटर बेवारस लाकूड जप्त करीत गुन्हा दाखल केला. मात्र, आरा गिरण आणि एका लाकूड व्यावसायिकाच्या घरानजिक अशा दोन ठिकाणी लाकूड पकडले. परंतु, फक्त आरा गिरणीवरील लाकडाचा पंचनामा करुन ते जप्त केल्याची जोरदार चर्चा कोळपे परिसरात सुरु आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग