शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिष्यवृत्ती आवेदनपत्रांसाठी इंटरनेटवरच मदार

By admin | Updated: November 5, 2014 23:33 IST

परीक्षा परिषद : आॅनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरण्यास प्रारंभ

टेंभ्ये : परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची आॅनलाईन आवेदनपत्र ठरण्यास सुरुवात झाली आहे. परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून आवेदनपत्र भरण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार शनिवार, दि. १ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान नियमित शुल्कासह आवेदनपत्र दाखल करता येणार आहेत. आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र दाखल करण्यात येणार असल्याने शाळांना पुन्हा एकदा इंटरनेट उपलब्धतेवर अवलंबून राहावे लागणार आहे.नियमित शुल्कासह पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र दाखल करुन चलनाची प्रिंट काढण्यासाठी १ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. चलनाप्रमाणे शुल्क बँकेत जमा करण्यासाठी १ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बँकेमध्ये चलन भरल्यानंतर चलन अपडेट करुन प्रपत्र अ ची प्रिंट काढण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र व परीक्षा परिषदेची चलनाची कॉपी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे दि. ९ डिसेंबरपर्यंत जमा करावी लागणार आहे. नियमित शुल्कासह आवेदनपत्र दाखल करु न शकणाऱ्या शाळांसाठी विलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. आॅनलाईन आवेदनपत्र भरणे व चलनाची प्रिंट काढण्यासाठी दि. ५ ते १९ डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. चलनाप्रमाणे निर्धारित शुल्क बँकेत जमा करण्यासाठी दि. २० डिसेंबर ही अंतिम दिनांक आहे. चलन अपडेट करुन प्रपत्र अ ची दि. २२ पर्यंत प्रिंट घेता येणार आहे, तर दि. २३ डिसेंबर ही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे आवश्यक प्रमाणपत्र व चलनाची प्रत जमा करण्याची शेवटची मुदत आहे. तसेच दि. २० डिसेंबरपासून परीक्षा सुरु होण्यापूर्वी १५ दिवसापर्यंत अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरता येणार आहेत. आॅनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी शाळांना एक पासवर्ड देण्यात आला आहे. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरील होमपेजवर असलेल्या स्कूल इन्फॉर्मेशन गेटवेमधील प्रपत्रात नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर पासवर्ड व लॉगीन आयडी एसएमएस केला जातो. १ नोव्हेंबरअखेर ज्या मुख्याध्यापकांना एसएमएसद्वारे लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त न झाल्यास या पेजवरील विहीत नमुन्यात भरलेला अर्ज स्कॅन करुन या पेजवर दिलेल्या इमेलद्वारे पाठवावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.एकंदरीत आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील शाळांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. दुर्गम भागातील अनेक शाळांना तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरात जाऊन सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे पूर्वीची आवेदनपत्र दाखल करण्याची पद्धत उपयुक्त होती, असे मत अनेकजणांनी व्यक्त केले. (वार्ताहर)नियमित शुल्कासह ४ डिसेंबरपर्यंत मुदत.आॅनलाईन पद्धतीने भरली जाणार आवेदनपत्र.आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील शाळांसमोर मोठी समस्या.दुर्गम भागातील अनेक शाळांना शहरातील सायबर कॅफेचा आधार.