शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:41 IST

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार सभापतींचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सभापती अनुश्री कांबळी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.महाराष्ट्र राज्यात रविवारी सर्वत्र शासनमान्य शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी व आठवीमधील विद्यार्थी या परीक्षेला बसविले जातात. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूलमधील केंद्रात रविवारी जे विद्यार्थी बसविण्यात आले, त्यामधील अनेक विद्यार्थी अनोळखी असल्याचे दिसून आले.

पालकांनी त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, ती बरीच मुले ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नसून कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालकांनी याबाबत आवाज उठवित त्या मुलांना या सेंटरवर परीक्षेला बसण्याची परवानगी कोणी दिली? याचा जाब विचारला.दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य दादा कुबल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या हायस्कूलमध्ये धाव घेत पाहणी केली. तसेच या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ही मुले मातोंड हायस्कूलच्या नावावर बसल्याचे समोर आले आहे. येथील मुलांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे.

शाळेत या परीक्षेच्या सराव परीक्षा होतात. त्यावेळी या शाळेतील मुलांकडून एकावेळी एका विषयाचे तीन किंवा चार पेपर लिहून घेतात. त्या पेपरवर वेगळ््या मुलांची नावे असतात, असे यावेळी मुलांनी पालकांशी बोलताना सांगितले.यावेळी कुबल यांच्यासह परबवाडा सरपंच पपू परब, तुळसचे माजी सरपंच आपा परब, सदस्य शेखर तुळसकर यांच्यासह पालक उपस्थित होते.शिक्षण विभागाने कारवाई करावीघाटमाथ्यावरील मुले या परीक्षेत मेरीटमध्ये यावीत, यासाठी त्यांना वर्षभर या परीक्षेच्या क्लासला बसविले जाते आणि अशा पद्धतीने एखाद्या शाळेतून त्यांना परीक्षेला बसविण्यात येते. या प्रकारामुळे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या हायस्कूलच्या भूमिकेवर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीsindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन