शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी टर्मिनस झालंच पाहिजे, काँग्रेसची आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 15:00 IST

सावंतवाडी-मळगाव येथील रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळूनही या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडत स्थानकप्रमुखांना निवेदन देण्यात आले.

तळवडे : सावंतवाडी-मळगाव येथील रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळूनही या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडत स्थानकप्रमुखांना निवेदन देण्यात आले. येत्या काही दिवसांत गाड्यांना थांबा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.  सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन होऊन कित्येक महिने उलटून गेले, तरी टर्मिनसचे काम अपूर्णावस्थेत असल्याने तसेच विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने शनिवारी आंदोलन करून  प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. जनतेला विकासाचे गाजर दाखवून फसविण्यात येत असल्याची टीका करीत भाजप व शिवसेना सरकारचा घोषणा देऊन निषेध केला. सावंतवाडी रेल्वेस्थानक हे ‘अ’ दर्जाचे स्थानक आहे.  

तीन वर्षांपूर्वी याची रेल्वे टर्मिनस म्हणून घोषणा झाली. मोठा गाजावाजा करून माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. मात्र या ठिकाणी नवीन काही केले नाही. कोकण रेल्वे असे नाव देऊनही किती गाड्या कोकणच्या शेवटच्या स्थानकावर थांबतात? असा जाब स्थानकप्रमुख  एस. महाजन यांना विचारत या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्याच पाहिजेत, अशी मागणी प्रांतिक सदस्य चंद्रकांत गावडे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. 

यावेळी चंद्रकांत गावडे यांच्यासह सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष बाबल्या दुभाषी, बाळा जाधव, आबा सावंत, दिगंबर परब, संजय लाड, महिला तालुकाध्यक्षा अमिदी मेस्त्री, माजी जिल्हा परिषद सदस्या निकिता जाधव, नूतन सावंत, माया चिटणीस, विभावरी सुकी, आशा कंटक, संतोष जोईल, अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, महेश खानोलकर, सुधीर मल्हार, उमेश सावंत, संजय लाड, महेश देऊलकर, कौस्तुभ गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी स्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाचे लक्ष वेधलेयावेळी काँग्रेसच्यावतीने स्थानकप्रमुख एस. महाजन यांना निवेदन देण्यात आले. यात दादर-तुतारी गाडी एक नंबर प्लॅटफॉर्मवरून सुटावी, रेल्वे प्रकल्पग्रस्तांना स्टॉल उपलब्ध करून द्यावेत, स्थानकानजीकच्या जुन्या  सावंतवाडी-मळगाव-मळेवाड या जोडरस्त्याची दुरुस्ती करावी, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात तसेच स्थानकाचा टर्मिनसनुसार विकास व्हावा आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.