शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धो धो पावसाने सावंतवाडीकरांची तारांबळ, शहरात घुसले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 18:03 IST

पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी येण्याची भीती महसूल विभागाने व्यक्त केली आहे.

सावंतवाडी : रविवारी सायंकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवारी सकाळी तर सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौकात पाणी आले होते. पाणी चार ते पाच दुकानात शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. तर  चितारआळी भागात संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे. तालुक्यात आंबोली घाटात दरडीची माती खाली आल्याने काहि काळ वाहतूकही ठप्प झाली होती. तर चौकूळ येथेही नदी तुडूंब भरून वाहत होती. तसेच झाराप पत्रादेवी मार्गावर नेमळे येथे पाणी आल्याने अनेक वाहनधारक रस्ता शोधत वाहतूक करताना दिसत होते. पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी येण्याची भीती महसूल विभागाने व्यक्त केली आहे.सावंतवाडी तालुक्यात रविवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी ही पावसाचा जोर तसाच होता. पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने मोती तलावाच्या पाण्याची पातळी वाढली होती. तसेच शहरातील जयप्रकाश चौकात अनेक दुकानात पाणी शिरले होते. तर रस्त्यात पाणी भरल्याने अनेक वाहनधारक रस्ता शोधत वाहतूक करताना दिसत होते. पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले होते. त्यामुळे बाजारातही सकाळच्या सत्रात तुरळक माणसे दिसत होती. सोमवार असूनही बाजारात गर्दी नव्हती. येथील चितारआळी भागातही पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. यात कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.सावंतवाडी शहराबरोबरच तालुक्यातही पावसाचा जोर कायम असल्याने आंबोली, चौकुळ तसेच नेमळे, निगुडे अशा अनेक गावांना याचा फटका बसला आहे. आंबोली घाटातील दरडीची माती खाली आल्याने काहि काळ वाहतूक ठप्प झाली होती. पण नंतर माती बाजूला करून वाहतुक सुरळित सुरू झाली. त्या शिवाय चौकुळ येथील नदीलाही पूर आला आहे. तर नेमळे येथे झाराप पत्रादेवी महामार्गावर पाणी आल्याने अनेक मोठे वाहनधारक रस्ता शोधत मार्ग काढताना दिसत होते. दुपारी उशिरा येथील पाणी कमी झाले. त्यानंतर वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली होती.पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे उशिरापर्यंत झाले नव्हते, असे महसूल विभागाने स्पष्ट केले. ही हानी सुमारे पाच ते दहा लाख रूपयांच्या घरात जाउ शकते, असे मत महसूलच्या अधिकाºयांनी व्यक्त केले. मात्र या पावसामुळे कुठेही जीवितहानी झाली नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.