शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नैनिताल, चंदीगडपेक्षाही सावंतवाडी शहर सुंदर : मोहम्मद अजीज खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:57 IST

राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लीम संस्थेच्यावतीने खान यांनी १२ हजार किलोमीटरचा देश पायी जाण्याचा संकल्प सोडला आहे. आतापर्यंत त्यांनी साडेदहा हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. लेहपासून कन्याकुमारी आणि आता कन्याकुमारीपासून अमृतसर असा प्रवास करत आहेत.

ठळक मुद्देनैनिताल, चंदीगडपेक्षाही सावंतवाडी शहर सुंदर : मोहम्मद अजीज खानगोसेवा सद्भावनेनिमित्त सावंतवाडी शहरात पदयात्रा

सावंतवाडी : माझ्या संपूर्ण भारत भ्रमंतीत नैनिताल आणि चंदीगडपेक्षाही सावंतवाडी शहर सुंदर व स्वच्छ वाटले. ही सुंदरता अशीच कायम ठेवा, असे आवाहन गोसेवा सद्भावनेनिमित्त पदयात्रा करीत सावंतवाडीत आलेल्या मोहम्मद अजीज खान यांनी केले.राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लीम संस्थेच्यावतीने खान यांनी १२ हजार किलोमीटरचा देश पायी जाण्याचा संकल्प सोडला आहे. आतापर्यंत त्यांनी साडेदहा हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. लेहपासून कन्याकुमारी आणि आता कन्याकुमारीपासून अमृतसर असा प्रवास करत आहेत. ते सावंतवाडी शहरात दाखल झाले. यावेळी त्यांचा सावंतवाडी नगरपालिका व वेदशाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मी आतापर्यंत २१ महिन्यात अनेक गावे, शहरे फिरलो. मात्र, सावंतवाडीसारखे सुंदर आणि स्वच्छ शहर कुठेही दिसले नाही. याचे सर्व श्रेय येथील नगराध्यक्षांना देणे क्रमप्राप्त असल्याचे ते म्हणाले. गोसेवेसाठी ही देशभ्रमंती सुरू केली आहे.

गाय वाचविण्याची गरज असून, त्यासाठी समाजातील सर्व थरातील लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गायीच्याबाबतीत राजकारण करणे चुकीचे आहे. गीता, गायत्री आणि राम हेच सर्व समाजासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे त्याचे कुणी राजकारण करत असेल तर ते अयोग्य आहे, असे मत मोहम्मद खान यांनी मांडले.गोसंवर्धन काळाची गरज : मोहम्मद खानगाईचे संवर्धन ही काळाची गरज असून, याबाबत जनजागृतीसाठी आपली पदयात्रा सुरू आहे. कॅन्सरमुक्त भारत असा पण करून आपल्या या पदयात्रेला सुरुवात केली आहे. गायीपासून मिळणारे पंचगव्य मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने बहुपयोगी आहे. विविध आजारांवर औषध म्हणून उपयोगी ठरणाऱ्या पंचगव्याचा कॅन्सरमुक्त होण्यासाठीही वापर केला जातो, अशी माहिती खान यांनी दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग