साटेली भेडशी : सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती महेश गवस यांनी केले. ते म्हणाले, महिलांनी सक्षमीकरणासाठी विविध स्तरावर सहभाग घेणे गरजेचे आहे. १८ व्या शतकातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सावित्रीबार्इंनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. महिलांनी त्यांचा आदर्श ठेवून समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवावा.या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती गवस यांच्या हस्ते झाले. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी जी. ए. धर्णे, सासोली सरपंच गुरुदास गांजील, प्रशिक्षक नारायण परब, मुकुंद परब, सुजाता देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रशांत चव्हाण यांनी पंचायत समितीमध्ये असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन समील नाईक यांची, तर ग्रामसेवक सुजाता जगताप यांनी आभार मानले. (वार्ताहर)क्रांतिज्योती प्रशिक्षणराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत दोडामार्ग पंचायत समितीच्यावतीने ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी क्रांतिज्योती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सासोली येथील मंदार सभागृहात करण्यात आले होते.
सावित्रीबार्इंचे योगदान महत्त्वाचे
By admin | Updated: January 29, 2015 00:54 IST