शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

सावंतवाडीत डास झिरो नाही हिरोच

By admin | Updated: September 30, 2015 00:09 IST

परूळेकरांचा साळगावकरांना टोला : रूग्णालयामध्ये माहिती घेण्याचा सल्ला

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका ‘झिरो डास’चा दावा करीत आहे. मात्र, हा दावा सपशेल खोटा असून सावंतवाडीत डास झिरो नसून हिरोच आहेत. त्यामुळे रूग्णालये भरलेली दिसत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, शिक्षण सभापती गुरू पेडणेकर, माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, सुधीर आडिवडेकर, साक्षी वंजारी, संदीप सुकी, दिलीप भालेकर, संतोष जोईल आदी उपस्थित होते.सावंतवाडी नगरपालिका स्मार्ट सिटीची स्वप्ने बघत आहेत. पण त्यांनी पायाभूत सुविधांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मोती तलावाकाठचा विकास म्हणजे शहराचा विकास म्हणणे चुकीचे असून शहरातील रस्ते तसेच आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून याकडे दुर्लक्ष होत आहे. पालिका मोठ्या प्रमाणात उत्पादन घेते. पण त्याचा फायदा कुणाला होतो, असा सवाल करीत पालिकेचे सुसज्ज असे रूग्णालय नाही, अशी खंत डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केली.पालिका एक डॉक्टर व एक कंपाऊं डर यांच्यावरच आतापर्यंत दिवस ढकलत असून मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत या पालिकेकडे आहे. ते पाणी इतर गावांना देऊन त्यातून येणाऱ्या उत्पादनातून वेगवेगळे प्रकल्प तसेच सुसज्ज हॉस्पिटल करण्यात येऊ शकते. पण त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. शहरातील रस्ते अरूंद आहेत. भविष्यात पर्यटन दृष्ट्या जर शहराचा विकास व्हायचा असेल, तर रस्ते मोठे करणे गरजेचे आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी शहरातून जाणारा महामार्ग कुणाची संपत्ती वाचण्यासाठी बाहेरून गेला, हे जाहीर करावे. याचा मोठा परिणाम आता येथील बाजारपेठांवर दिसू लागला असून, भविष्यात जर यापेक्षाही सावंतवाडीचा विकास करायचा झाला, तसेच पर्यटक या ठिकाणी आणायचे झाले, तर त्यासाठी वेगळी योजना आखावी लागेल. मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवण-तारकर्लीकडे वळू लागले आहेत, असेही यावेळी डॉ. परूळेकर म्हणाले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना का घेराव घालता?सातारा येथे जाणारी धान्याची पोती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली. ही धान्याची पोती पकडली ही बाब चांगली, पण सत्तेत राहून अधिकाऱ्यांना कसला घेराव घालता? हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांना घेराव घाला आणि जाब विचारा. काँग्रेस नेते नारायण राणे असताना अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची कधी नामुष्कीही काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली नव्हती. पण आताच्या पालकमंत्र्यानी ही नामुष्की कार्यकर्त्यांवर आणली, असा आरोपही परूळेकर यांनी केला..अधिकाऱ्यांना का घेराव घालता?सातारा येथे जाणारी धान्याची पोती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली. ही धान्याची पोती पकडली ही बाब चांगली, पण सत्तेत राहून अधिकाऱ्यांना कसला घेराव घालता? हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांना घेराव घाला आणि जाब विचारा. काँग्रेस नेते नारायण राणे असताना अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची कधी नामुष्कीही काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली नव्हती. पण आताच्या पालकमंत्र्यानी ही नामुष्की कार्यकर्त्यांवर आणली, असा आरोपही परूळेकर यांनी केला..