शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

सारंग कुलकर्णी यांची ‘सी-वर्ल्ड’मधून माघार

By admin | Updated: October 19, 2015 23:46 IST

एजन्सीने मानधन थकविल्यानेच निर्णय

मालवण : राज्य शासन आणि एमटीडीसी यांच्याबरोबर काम करत आपण आजपर्यंत मांडलेल्या स्कुबा डायव्हींग सेंटर, सी - वर्ल्ड, आंग्रीया बँक या सर्व प्रकल्पांना सहकार्य मिळाले आहे. यातूनच सी - वर्ल्डसारखा आंतरराष्ट्रीय दजार्चा प्रकल्प साकारण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी स्वत:हून लक्ष देऊन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अडचणीचा ठरत असलेला जमिनीचा मुद्दाही सोडवला आहे. ज्याची निर्मिती आणि प्रकल्प प्रमुख म्हणून काम केले, त्या सी-वर्ल्डसंबंधित आपले मानधन सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क या एजन्सीने थकवल्यानेच इच्छा नसतानाही या प्रकल्पातून आपण माघार घेतली आहे, असे आंतरराष्ट्रीय सागरतज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी सांगितले.सी - वर्ल्डचे निर्मातेच प्रकल्पात नसल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असल्याबद्दल डॉ. कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर स्कुबा डायव्हींग सेंटर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. लवकरच विविध प्रशिक्षण कार्यक्रम त्यामध्ये घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राज्य शासनाने सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी नेमलेल्या पुणे येथील सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेने दीड वर्ष आपले मानधन थकवल्यानेच सी - वर्ल्ड प्रकल्पापासून आपण फारकत घेतली आहे. हा निर्णय घेताना नक्कीच दु:ख झाले. प्रकल्पाचा आराखडा, सर्वांच्या संमत्तीसाठी घेतलेली मेहनत आणि प्रसंगी केलेली पदरमोड यामुळे आपण कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण झाली होती. शासनाच्या एजन्सीकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)प्रकल्पांकडे लक्ष देणारसारंग कुलकर्णी प्रकल्पात नाहीत. त्यामुळे सध्या कार्यरत असणारी संस्था हा प्रकल्प कशाप्रकारे पूर्ण करते, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. एमटीडीसीकडे वेळोवेळी मांडलेल्या संकल्पनेला शासनाने प्रोत्साहन दिल्यामुळे मालवणात आणि जिल्ह््यात पर्यटनाची व्याप्ती वाढलेली आहे. सध्या हा व्यवसाय १५ कोटींची उलाढाल करणारा ठरला आहे. आता आपण आंग्रीया बँक आणि स्कुबा डायव्हींग प्रकल्पांकडे लक्ष देणार आहोत. राज्य आणि केंद्र शासन या दोन्ही प्रकल्पांसाठी चांगले वातावरण निर्माण करत असल्याने लवकरच पर्यटनाला वेगळी दिशा मिळणार असल्याचा विश्वास डॉ. सांगर यांनी व्यक्त केला.