शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाळू लिलाव झाले... कब्जा केव्हा

By admin | Updated: January 12, 2016 00:34 IST

ठेकेदारांचा सवाल : कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक रकमेचे व्याज शासन देणार का?

अजित चंपूणावर --- बुबनाळ -शिरोळ तालुक्यात वाळू प्लॉटच्या लिलावानंतर ठेकेदारांना कब्जापट्टी न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. शासनाने काढलेल्या लिलावात भाग घेऊन वाळूसाठे घ्यायचे, त्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायची, अशी परिस्थिती असताना वाळू उपसा करण्यासाठी रीतसर परवाना मिळत नसल्याने ठेकेदारांची गोची झाली आहे.दरम्यान, तालुक्यातील गौरवाडचा एक प्लॉट वगळता उर्वरित सर्व साठ्यांची ठेकेदारांनी संपूर्ण रक्कम भरली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे वाळू उपसा करता येत नसल्यामुळे वाळू व्यावसायिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त होत आहे. यंदा पावसाअभावी महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वाळू गटाचे लिलाव होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, शिरोळ तालुक्यात २४ नोव्हेंबर २०१५ ला ई-टेंडर पद्धतीने वाळूसाठ्यांचे लिलाव झाले. लिलावाची संपूर्ण रक्कम ठेकेदारांनी १४ ते १७ डिसेंबर २०१५ अखेर भरली असल्याचे समजते. त्यामुळे लिलावाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर संबंधित विभागाकडून सात दिवसांच्या आत वाळू गटाची कब्जापट्टी व रॉयल्टी पावती पुस्तक देणे बंधनकारक आहे.एकीकडे वाळू ठेकेदारांनी काही कोटी रुपये गुंतवणूक करून लिलाव घेऊन दीड महिन्याचा काळ लोटला आहे. भरलेल्या पैशाला व्याज शासन देणार का? असा सवाल ठेकेदारांतून उपस्थित होत आहे. वाळू व्यवसायावर वाहतूकदार, बांधकाम व्यावसायिक, मजूर अनेक घटकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे तत्काळ कब्जापट्टी द्यावी, अशी मागणी होत आहे.वरिष्ठांकडून आदेश नाही : पुजारीवाळूच्या प्लॉटचे लिलाव झाले असले तरी वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यानंतर पंचनामा करून लिलाव गट नंबरचा ताबा देण्यात येणार आहे. मात्र, अजूनही वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत आदेश मिळाले नसल्याचे नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी यांनी सांगितले.