शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधव यांना सामंत यांचे प्रतिआव्हान

By admin | Updated: July 1, 2016 23:42 IST

विधानसभा : जाधव यांच्यासमोर कोठेही लढण्याची तयारी

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार, असे सांगून आव्हान देणाऱ्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांना आमदार उदय सामंत यांनी शुक्रवारी प्रतिआव्हान दिले. रत्नागिरी किंवा गुहागरच काय, राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. रत्नागिरीतून मीच काय, सेनेच्या कोणत्याही उमेदवाराने निवडणूक लढवली तरी जाधव यांचा पराभव निश्चित आहे, असेही सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ठणकावले.रत्नागिरी माळनाका येथे गुरुवारी (दि. ३०) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता, त्यावेळी आमदार जाधव यांनी सामंत यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर चौफेर टीकाही केली होती. आघाडीच्या काळात झालेली कामे आपण केल्याचे सांगून आमदार सामंत श्रेय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याबाबत बोलताना आमदार सामंत म्हणाले की, मी राष्ट्रवादीत आमदार असताना आघाडीच्या काळात येथे विकासकामे झाली हे मान्य आहे. परंतु, गद्दारीचा विषय आता जुना झाला आहे, हे कोणीतरी जाधव यांना सांगण्याची गरज आहे. मेळाव्याच्यावेळी व्यासपीठावर असलेल्यांपैकी एक-दोघे सोडले तर बाकीच्या लोकांची निष्ठा जाधव यांनी तपासून बघायला हवी. गद्दारीचा आरोप माझ्यावर करताना मेळाव्यात व्यासपीठावर असलेल्यांनी किती वेळा गद्दारी केली, याचा इतिहास प्रथम जाधव यांनी तपासून घ्यावा, असेही सामंत म्हणाले.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील १०९ पैकी ९४ ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे. ११ ग्रामपंचायती भाजपकडे, दोन गाव पॅनेलकडे, एक कॉँग्रेसकडे, तर रत्नागिरी तालुक्यात बळ वाढत असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे केवळ एक ग्रामपंचायत आहे. जाधव यांना त्यांच्याच पक्षातील लोक चुकीची माहिती देत आहेत. चुकीच्या माहितीवर बोलणे राष्ट्रवादीतील जबाबदार व्यक्तीला कितपत शोभते, हा खरा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)संधिसाधूंकडून जाधव यांचा ढालीसारखा वापरजाधव हे प्रामाणिक आहेत, तसेच भावनाशीलही आहेत. त्यामुळे त्यांना कोणी काही सांगितले की तेच सत्य मानून भावनेच्या भरात ते बेधडक बोलत जातात. त्याचाच फायदा त्यांच्या पक्षात त्यांच्याबरोबर वावरणारे लोक घेत आहेत. स्थानिक नेते जाधव यांना ढाल म्हणून पुढे करीत स्वत:चा उद्देश साध्य करून घेत आहेत. जाधव यांच्या मागेपुढे फिरत आपण पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, असे म्हणणाऱ्यांनीच अनेकदा गद्दारी केल्यामुळे अशा संधिसाधूंसाठी ढाल बनायचे की नाही, हे आता जाधव यांनीच ठरवावे, असा टोलाही आमदार सामंत यांनी लगावला.