शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केसरकरांच्या मतदारसंघात साळगावकरांनी केलं आदित्य ठाकरेंचं स्वागत; शिवबंधनची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 21:41 IST

आमदार दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रेच्या निमित्ताने शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सोमवारी आले होते.

सावंतवाडी-

आमदार दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रेच्या निमित्ताने शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सोमवारी आले होते. यावेळी त्यांचे स्वागत जुन्या शिवसैनिकांनी केले. खास करून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीतील गवळीतिट्टा परिसरात केलेले स्वागत चर्चेचा विषय बनला आहे.

यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव,उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे,संजय नार्वेकर,बंटी माटेकर,शुभम मलकाचे,रवी जाधव आदिसह मोठ्याप्रमाणात शिवसैनिक तसेच साळगावकर यांचे सोबती उपस्थित होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे प्रथमच सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दुपारच्या सुमारास त्यांचे कुडाळ हून सावंतवाडी परिसरात आगमन झाले तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर जुन्या शिवसैनिकांनीही ठाकरे यांचे स्वागत केले.

अनेक शिवसैनिक हे काम करण्याची इच्छा असतानाही आमदार केसरकर यांच्यापासून लांब होते त्यांनीही ठाकरे यांच्या दौऱ्यात सहभाग घेतल्याचे दिसून आले तर दुसरीकडे शिवसेनेतून  वेगवेगळ्या पक्षात गेलेल्या काही जुन्या शिवसैनिकांना ही शिवसेने बद्दल प्रेम निमार्ण झाल्याचे दिसून आले.विशेषता सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले होते.पण आज शिवसेनेच्या पडत्या काळात ठाकरे यांची भेट घेत सावंतवाडीत स्वागत केल्याचे दिसून आले.

साळगावकर यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केल्याने सावंतवाडीत पुन्हा एकदा साळगावकर शिवसेनेत जाणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे मात्र त्यांनी आपण फक्त स्वागत केल्याचे सांगितले साळगावकर यांच्यासोबतच शिवसेनेतील अनेक जुन्या शिवसैनिकांनीही ठाकरे यांचे स्वागत केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना