शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चोरलेल्या दुचाकींची विक्री

By admin | Updated: August 9, 2016 23:54 IST

वीस गाड्या जप्त : आचऱ्यातील एजंटाकडून केले जात होते व्यवहार

आचरा : मुंबई आणि ठाणे येथून दुचाकी चोरून त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्री करणाऱ्या सूत्रधारास ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करीत या भागात २० दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. विकण्यात आलेल्या २० दुचाकींपैकी १५ दुचाकी आचरा पंचक्रोशीत विकल्या गेल्याची माहिती उघड होत आहे. मात्र, याबाबत आचरा पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.ठाणे गुन्हे अन्वेषण खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणातील चोरट्यांचे रॅकेट उघड होणार आहे. या दुचाकी मालवण, कणकवली, देवगड परिसरात विकण्यात आल्या होत्या. ठाण्यात बारमध्ये काम करणारा चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकी विकत असे. आचऱ्यातील स्थानिक एजंटामार्फत तो जिल्ह्यात दुचाकीची विक्री करत असल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)दुचाकी कमी किमतीत विकण्याचा व्यवसायठाणे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती ही पनवेल येथे राहत असे व ठाणे येथील एका बारमध्ये अटेंडन्ट म्हणून काम करत होती. काही चोरटे मौजमजा करण्यासाठी बारमध्ये येत असत. पैसे देण्याची वेळ झाली की, ते पैसे नसल्याचा बहाणा करीत. चोरलेली दुचाकी त्याच्याकडे ठेवत असत आणि पैसे नंतर देऊ असे त्याला सांगत. याच व्यक्तीने पैसे कमविण्याच्या लालसेपोटी या दुचाकी कमी किमतीत ग्रामीण भागात आणून विकण्याचा धंदा सुरू केला.तपासानंतर माहिती : पोलिस आचरा गावातील एका व्यक्तीची या चोरीच्या दुचाकी विकणाऱ्याशी ओळख झाली. तो आचऱ्यातील एजंटाला दुचाकी आणून देत असे. हा एजंट आचरा, कणकवली, मालवण, देवगड परिसरात या दुचाकींसाठी ग्राहक मिळवून देत असे. या प्रकरणाचा ठाणे पोलिस तपास करीत असून त्यानंतरच माहिती देण्यात येईल, असे आचरा पोलिसांनी सांगितले.