कणकवली : बोगस कुळमुखत्यारपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी सांगवे येथील महेंद्र हरी सावंत व प्रभाकर महादेव सावंत यांना अटक करण्यात आली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता २१ जून पर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी दिली आहे.दर्शना दिगंबर तावडे (रा. मुंबई सांताक्रुझ) यांचे वडील शांताराम गोपाळ सावंत (रा. सांगवे संभाजीनगर) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या नावे असलेली जमीन (गट नं. १०४७) बाबत २७ एप्रिल २०११ रोजी महेंद्र सावंत व प्रभाकर सावंत यांनी संगनमत करून बोगस कूळमुखत्यारपत्र तयार केले. प्रभाकर सावंत यांनी स्वत:चा फोटो लावून तसेच अंगठा उठवून तक्रारदाराची खोटी सहीही केली. तसेच त्या जमिनीपैकी २० गुंठे जमिनीची विक्री केली. याबाबत दर्शना तावडे यांना समजताच त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी संबंधितांना अटक केली आहे. (वार्ताहर)
बोगस जमीन विक्री ;
By admin | Updated: July 17, 2014 23:08 IST