शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदार संघावर भगवा फडकवा  : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:47 IST

कणकवली मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला गेल्या निवडणुकीत जरी कमी मते पडली असली तरी आता शिवसेनेची ताकद वाढत आहे. कुडाळ व सावंतवाडी मतदार संघात ज्याप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला त्याच प्रमाणे कणकवली मतदार संघावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी आता सज्ज व्हा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे केले.

ठळक मुद्देकणकवली विधानसभा मतदार संघावर भगवा फडकवा :वैभव नाईकशिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक

कणकवली : कणकवली मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला गेल्या निवडणुकीत जरी कमी मते पडली असली तरी आता शिवसेनेची ताकद वाढत आहे. कुडाळ व सावंतवाडी मतदार संघात ज्याप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला त्याच प्रमाणे कणकवली मतदार संघावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी आता सज्ज व्हा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे केले.कणकवली- देवगड- वैभववाडी -विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत विजय भवन येथे झाली.

या बैठकीत तिन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे, नवीन पदाधिकारी नियुक्त्या, संघटना वाढीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वैभव नाईक यांनी मार्गदर्शन करताना पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.अरुण दुधवडकर म्हणाले, पक्ष संघटना वाढीसाठी विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख यांनी गावागावात जोमाने काम केले पाहिजे. कणकवली मतदार संघात आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आतापासूनच कामाला लागा.

प्रत्येकाने पक्षाशी प्रामाणिक राहून जास्तीत जास्त नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करा. जुन्या नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करा. शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर आपल्याला विजय संपादन करण्यासाठी लढायचे आहे असेही ते म्हणाले.यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, विधानसभा संघटक सचिन सावंत , तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, देवगड तालुका प्रमुख मिलींद साटम, प्रसाद करंदीकर, देवगड उपसभापती संजय देवरुखकर, राजू राठोड , महिला आघाडी प्रमुख नीलम पालव- सावंत, विलास साळसकर,डॉ प्रवीण सावंत, अमेय जठार, स्वप्नील धुरी, योगेश मुंज,सुजित जाधव, मीनल तळगावकर, भालचंद्र दळवी आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग