शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाचे सेलिब्रेशन संपवून सचिन तेंडुलकर थेट मैदानावर, गोव्याहून अहमदाबादच्या दिशेने रवाना

By अनंत खं.जाधव | Updated: April 25, 2023 18:10 IST

मुंबईचा आज गुजरातशी सामना 

सावंतवाडी : 50 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे येथे आलेल्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवारी सकाळी गोव्याच्या दिशेने रवाना झाला असून. तो गोव्याहून विमानाने अहमदाबादला रवाना होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले.सचिनचा मुलगा अर्जुन हा मुंबई इंडियन्स कडून खेळत असून त्याचा आज अहमदाबाद येथील मैदानावर गुजरात विरूद्ध सामना आहे. त्यासाठी सचिन कुटुंबासमवेत अहमदाबादकडे रवाना झाला.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला 50 वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे येथील एका पंचतारांकित हॉटेल्स मध्ये साजरा केला. तो रविवार पासूनच भोगवे येथे आला होता. तेथील बीचचा आनंद लुटत क्रिकेट ही खेळला तसेच परूळे येथे मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. दोन दिवस सचिनने त्याच्या कुटुंबासह मित्रांसमवेत धमाल मस्ती केली. पर्यटनाचा आनंद लुटला.त्यानंतर आज सकाळीच वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटपून सचिन गोवा येथील मोपा विमानतळाकडे रवाना झाला तत्पूर्वी त्याने भोगवे येथील स्थानिकांना बाय बाय केले तसेच हाॅटेल व्यवस्थापन याच्या शुभेच्छा स्वीकारत फोटोसेशन ही केले. सचिनच्या आगमनाने त्याचे चाहते चांगलेच खुश झाले होते. मात्र सकाळीच तो भोगवे वरून परूळे पिगुळी वरून थेट झाराप पत्रादेवी महामार्गावरून मोपा विमानतळावर पोचला यावेळी तो गोव्याहून थेट अहमदाबादकडे रवाना झाला.मुंबईचा आज गुजरातशी सामना सचिनचा मुलगा अर्जुन हा मुंबई इंडियन्स कडून खेळत असून आज त्याचा सामना गुजरात विरूद्ध अहमदाबाद येथील मैदानावर होणार असल्याने सचिन गुजरात कडे रवाना झाल्याचे सांगितले जाते. सचिन हा मुंबई इंडियन्सच्या मॅनेजिंग कमिटीचा सदस्य असून तो टिम सोबत असणे ही तेवढेच गरजेचे असल्याने सचिन अहमदाबादकडे रवाना झाल्याची माहिती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSachin Tendulkarसचिन तेंडुलकर