शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. कामगार संघटनेला खिंंडार

By admin | Updated: January 25, 2016 01:02 IST

कार्यकर्ते इंटकमध्ये

सावंतवाडी : महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस तथा इंटक संघटनेचे राज्याध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडीतील एस. टी. कामगार संघटनेचे माजी सचिव अरूण गवस यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी इंटक संघटनेत प्रवेश केला. यामुळे सावंतवाडी एस. टी. कामगार संघटनेला मोठे खिंंडार पडले आहे. येथील मातृछाया मंगल कार्यालयात झालेल्या इंटकच्या मेळाव्यात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी इंटकचे विभागीय सचिव एच. बी. रावराणे, सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष अशोक राणे, कार्याध्यक्ष कृष्णा राणे, खजिनदार आशिष काणेकर, डेपो अध्यक्ष अरूण सरदेसाई, सचिव रावजी राणे, माजी उपाध्यक्ष बी. जे. तुळसकर, भाई राणे, कणकवली आगाराचे अध्यक्ष गणेश गिरकर, सुधीर सावंत, हेमंत इंगळे, आनंद शिरसाट, किरण पाटील, बी. डी. राऊळ, लियाकत शेख उपस्थित होते. दरम्यान, मागील महिन्यात इंटकच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनावेळी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एस. टी. कामगारांना २५ टक्के पगारवाढ देण्याची ग्वाही दिली होती. ३१ मार्चपर्यंत ही पगारवाढ न मिळाल्यास संघटनेच्यावतीने संप पुकारण्यात येईल, असा इशारा यावेळी छाजेड यांनी दिला होता. प्रवेशकर्त्यांमध्ये सी. व्ही. सोनुर्लेकर, शाम हळदणकर, एस. टी. प्र्रभू, ए. पी. कदम, संतोष राणे, सी. ए. तेंडोलकर, आर. ए. आडके, सुरेश धुरी, एस. एस. जरग, एस. आर. ललित, डी. आर. गवस, एस. ए. भगत, टी. एम. पवार, आर. जे. झोरे, एन. पी. धुरी, जे. व्ही. कदम, बी. बी. खरूडे, बापू राऊळ, आर. एस. मोरे, ए. आर. नाईक, एम. पी. गवस, प्रवीण नाईक, के. एम. सावंत, एस. जी. ताटे, डी. एस. मसुरकर आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)