शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

सावंतवाडीत युवकांच्या अटकेची अफवा

By admin | Updated: August 22, 2014 01:06 IST

अन्य आरोपींच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचा मोर्चा : अत्याचार प्रकरणावरून राजकीय आरोपांची धुळवड कायम

सावंतवाडी : युवतीच्या अत्याचार प्रकरणावरून सावंतवाडीत सध्या जोरदार अफवांचे पिक पसरले आहे. गुरूवारी सकाळी शहरातून पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातमीने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांशी संपर्क केला असता, अशी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे सांगत पोलिसांनी अफवेचे खंडन केले आहे. तर बुधवारी सावंतवाडीत उडालेला राजकीय धुरळा गुरूवारीही कायम होता.काँग्रेसने या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी उघड माथ्याने फिरत आहेत. त्यांच्या अटकेसाठी शनिवार, २३ आॅगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर शिवसेनेने आमच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. मनसेने या प्रकारात स्थानिक पोलिसांना जबाबदार धरले आहे.मात्र, या प्रकरणात सावंतवाडीतील आणखी काही युवकांचा सहभाग असल्याचे अनेक प्रत्यदर्शींनी पाहिल्याने हे प्रकरण या सहाजणांपुरते मर्यादीत न राहता उर्वरित आरोपींवरही कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व थरातून होत आहे. दरम्यान, मंगळवारी सहा आरोपींना अटक केल्यानंतर अद्यापपर्यंत कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही. पण आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली, अशी अफवा गेले दोन दिवस शहरात पसरवण्यात येत आहे. गुरूवारी तर राजवाड्यानजीक एका बारमधून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात बड्या धेंड्याचे मुलगे आहेत, असे सांगण्यात आले. मात्र, सावंतवाडी पोलीस तसेच ओरोस पोलीस यांच्याशी याबाबत संपर्क केला असता, असे कोणतेही आरोपी पकडण्यात आले नाही, असे सांगण्यात आले तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती ही पोलिसांनी केली आहे.ही कारवाई स्थानिक पोलिसांनी केली नाही तर ती ओरोस येथील पोलिसांनी केली असल्याचे हे राजकीय पक्ष सांगत आहेत. तसेच आपल्याकडील काही प्रकरणे लवकरच पोलिसांजवळ देणार असल्याचे काहींनी सांगितले. सावंतवाडी शहरातील अल्पवयीन मुलीचा प्रकार पुढे आल्यानंतर असे अनेक प्रकार दिवसा ढवळ्या घडत असल्याचे पुढे येत आहे. यात सावंतवाडी शहरातील काही युवक नेहमी किमती मोबाईल तसेच आलिशान गाड्यांचा वापर करीत काही कॉलेज तरूणींना भुरळ घालतात आणि त्यांना फिरायला नेतात, अशा तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत. पण पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशामुळे हे प्रकार वाढीस लागत असून, आता तरी पोलिसांनी जागे व्हावे, अशी अपेक्षा शहरातील नागरिक करत आहेत.गुरूवारी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत एका महिला पदाधिकाऱ्याच्या मुलावर थेट आरोप केला आहे. हा मुलगा संबंधित मुलीच्या घरी रात्रीचा काय करीत होता. अनेकवेळा त्याचे आई व वडिल त्याला घरी घेऊन गेले आहेत. मग एवढा सभ्यतेचा आव आणून मुलाला वाचवण्यासाठी काही महिला पदाधिकारी या अंकुर महिला निवारण केंद्राच्या फेऱ्या का मारत आहेत, असा सवाल काँग्रेस उपस्थित करत आहे. तसेच या मुलाव्यतिरिक्त आणखी काही युवक असूून, हे युवक सध्या खुलेआम फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही, याप्रकरणातील आरोपींची यादी मोठी आहे. यातील सर्वांची नावे पोलिसांकडे देणार असल्याचेही काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे. याच्या तपासाची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)