शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह मात्र रॅपिडमध्ये आला निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 14:53 IST

CoronaVIrus Sindhudurg : सावंतवाडीत एका नगरपालिका कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने लागलीच रॅपिड टेस्ट केली; मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याने तिसऱ्यांदा केलेली चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या तांत्रिक घोळात मात्र कर्मचारी सध्या कोरोना रुग्ण म्हणून मनस्ताप भोगत आहे.

ठळक मुद्देआरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह मात्र रॅपिडमध्ये आला निगेटिव्ह घोळ प्रशासनाचा, मनस्ताप पालिका कर्मचाऱ्याला

सावंतवाडी : सावंतवाडीत एका नगरपालिका कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने लागलीच रॅपिड टेस्ट केली; मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याने तिसऱ्यांदा केलेली चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या तांत्रिक घोळात मात्र कर्मचारी सध्या कोरोना रुग्ण म्हणून मनस्ताप भोगत आहे.सावंतवाडी नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने सावंतवाडीतच आपल्या सहकाऱ्यांसह कोरोना चाचणी करून घेतली. ही चाचणी आरटीपीसीआर स्वरूपाची होती. त्यात त्याचा अहवाल दोन दिवसांनी आला आणि तो पॉझिटिव्ह होता. त्या मुळे तो एकदमच कोलमडून गेला. त्याचे घर ही कन्टेनमेंट झोन करण्यात आले. तसेच त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र त्याने आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने लागलीच रॅपिड टेस्ट केली. मात्र ती निगेटिव्ह आली.पहिल्या टेस्टचा अहवाल येण्यास दोन दिवस उशीर लागतो. त्यामुळे त्याला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. त्याने या सर्व घोळात तिसऱ्यांदा आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यात तो निगेटिव्ह आल्याने त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला खरा पण पहिल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रुग्ण म्हणून त्यांचे नाव आल्याने तो सध्या मनस्ताप सहन करत आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून झालेली ही तांत्रिक चूक मानायची की तो खराच पॉझिटिव्ह होता हे कोडे मात्र सुटू शकले नाही. मात्र असा प्रकार अनेकांच्या बाबतीत होतो. नंतर अनेकांना सर्व गोष्टीचा मनस्ताप ही सहन करावा लागतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी