शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘हत्ती हटाव’साठी ८० लाख रुपये मंजूर

By admin | Updated: August 26, 2014 22:19 IST

आॅक्टोबरपासून मोहीम सुरू होण्याची शक्यता; भूल देऊन कार्यवाही: विनायक राऊत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून असलेल्या तीन हत्तींना हटविण्यासाठी राज्य सरकारकडून ८० लाख रुपये मंजूर झाले असून, पावसाळ्यानंतर आॅक्टोबर महिन्यात ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी कर्नाटकातील प्रशिक्षित हत्तींना जिल्ह्यात आणले जाणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी कणकवलीत दिली. जिल्ह्यात एक मादी व दोन नर हत्ती असून या हत्तींना हटविण्यासाठी आतापर्यंत झालेले प्रयत्न विफल झाले आहेत. आता या हत्तींना भूल देऊन हटविण्यासाठी पूर्णत: वेगळी पद्धत राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी कर्नाटकमधून चार प्रशिक्षित हत्ती जिल्ह्यात आणले जातील. या हत्तींसह ३०-४० कर्मचाऱ्यांचा पूर्ण लवाजमा येणार आहे. त्यामध्ये हत्तींचे डॉक्टर्स, नर्सेस, माहूत, चारा घालणारे, आदींचा समावेश असेल. मालवण तालुक्यातील आंबेरी येथे या हत्तींसाठी मुक्काम करण्याचे ठिकाण निवडण्यात आले आहे. या ठिकाणी हत्तींसाठी विशेष अधिवास तयार करण्यात येईल. हत्तींसाठी चारा, गूळ, बदाम, आदींची बेगमी केली जाईल. या हत्तींना रेडिओ चिप्स बसविल्या जातील. कर्नाटकच्या पथकासमवेत स्थानिक सुमारे ३० लोकांचा समावेश केला जाईल. हे पथक आंबेरी येथे चार महिने राहील.या पथकातील प्रशिक्षित हत्ती आंबेरीत स्थिरावल्यानंतर काही कालावधीनंतर जंगली हत्तींसोबत या हत्तींना मिसळवून त्यांना हळूहळू आंबेरी येथील अधिवासात आणण्यात येईल. आंबेरी येथील अधिवासात आणल्यानंतर आसाम येथील प्रशिक्षित व अधिकृत डॉक्टरांकडून जंगली हत्तींना भुलीचे इंजेक्शन देऊन कर्नाटकात पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी कर्नाटकमधील पथक सुमारे चार महिने जिल्ह्यात वास्तव्य करणार आहे. ही मोहीम पावसाळ्यानंतर म्हणजे आॅक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली. (प्रतिनिधी)