शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गुहागर तालुक्यात आरपीआय, काँग्रेस दिशाहीन

By admin | Updated: February 19, 2017 00:32 IST

नव्याने तालुकाध्यक्ष निवड न झाल्याने तालुक्यातील काँग्रेस ‘बॅकफूट’वर गेली आहे

गुहागर : जिल्हा परिषद आणि गुहागर पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेमध्ये तिरंगी लढत होणार आहे. या लढतीत आरपीआय व काँग्रेस मात्र दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. गेली वर्षभर तालुक्यात काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. गतवेळच्या निवडणुकीत तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांच्या नेतृत्वाखाली मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा वाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने काँगे्रसने सर्व जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यापूर्वी राष्ट्रवादीचे सभापती नंदकिशोर पवार यांच्या कारकीर्दीत पाटपन्हाळे गणातून निवडून आलेल्या एकमेव काँगे्रस सदस्य स्मिता बेलवलकर यांना उपसभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली होती. प्रदीप बेंडल यांच्यानंतर अब्बास कारभारी नवे तालुकाध्यक्ष झाले. त्यानंतर तालुक्यात पक्षाला उभारी मिळेल, अशी आशा निर्माण झाली असताना ‘जैसे थे’च स्थिती राहिली. त्यानंतर अब्बास कारभारी यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन वर्षभराचा कालावधी उलटला, तरी नव्याने तालुकाध्यक्ष निवड न झाल्याने तालुक्यातील काँग्रेस ‘बॅकफूट’वर गेली आहे. यावेळी जिल्हा परिषद गट पडवेसाठी भरलेला एकमेव उमेदवारी अर्ज गजानन गडदे यांनी मागे घेतला तर पंचायत समिती गण खोडदेसाठी राजेंद्र अनंत साळवी हे एकमेव उमेदवार काँगे्रसकडून रिंगणात आहेत तर जिल्हा परिषद गट अंजनवेलमध्ये शंकर बाबुलनाथ गुरव, पालशेतमध्ये विजय शंकर विचारे निवडणूक रिंगणात आहेत. काँगे्रसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल या उमेदवारांसोबत प्रचार करीत असून, गुहागर तालुक्यात सध्या काँग्रेसची दिशाहीन झाल्यासारखी राजकीय स्थिती आहे. आरपीआयचीही तालुक्यात काँगे्रससारखीच स्थिती असल्याचे दिसत आहे. दोन टर्मपूर्वी सुरेश सावंत यांनी सर्व जागांवर आरपीआयचे उमेदवार उभे केले होते. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराजीत होऊन भाजप-सेनेकडे सत्ता गेली. त्यानंतर सुरेश सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व उपसभापतीपदही भूषविले. काँग्रेस व आरपीआयकडून निवडक जागांवरच उमेदवारी अर्ज भरल असून, त्यातीलही काही अर्ज ऐनवेळी मागे घेतल्याने दोन्ही पक्ष सध्या दिशाहीन झाल्याचे दिसत आहेत. (प्रतिनिधी)आरपीआयचा स्वतंत्र लढण्याचा निर्णयनिवडणूकीत आरपीआय मित्र पक्ष भाजप सोबत राहील, असे वाटत असताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये सुरेश सावंत यांचा पक्षप्रवेश झाल्याने येथील आरपीआय नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत अंजनवेल पालशेत व पडवे गट तसेच पंचायत समितीच्या पालपेणे, पालशेत, वेळणेश्वर वखोडदे गणातून उमेदवार उभे केले. यामधूनही गळती होत पालशेतमधून दिलीप हिरामण मोहिते, वेळणेश्वर मधून सुनील महादेव गमरे तट पडवे गटातून विद्याधर राजाराम कदम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.गेले वर्षभर गुहागरात काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद रिक्त.नव्याने निवड न झाल्याने काँग्रेस ‘बॅकफूट’वर.पडवे जिल्हा परिषद गटातून गजानन गडदेंचा अर्ज मागे.काँग्रेसबरोबरच आरपीआयचीही स्थिती दिशाहीनच.