शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या हाती विजेची दोरी

By admin | Updated: September 3, 2015 23:13 IST

महावितरण : विद्युत सहाय्यक पदावर २९ महिला

रत्नागिरी : वैज्ञानिक युगात विजेवर चालणारी अत्याधुनिक यंत्रसुविधा उपलब्ध आहे. विजेच्या यंत्रसुविधेमुळे अवघड काम सहज शक्य होते. मात्र, त्याचवेळी एखादा बिघाड झाला तर बिघाड दूर करणे अवघड काम. कारण विजेच्या बाबतीत ‘दया, माया, क्षमा शांती’ याला थारा नाही. परंतु आता या क्षेत्रात महिलांनीदेखील आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात पुरूष जनमित्रांच्या खांद्याला खांदा लावून २९ वायरवुमन कार्यरत आहेत.केवळ ‘विद्युत सहाय्यक’ एकमेव क्षेत्र असे होते की, त्यामध्ये महिला मागे होत्या. परंतु आता त्याही क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग परिमंडलांतर्गत कोकण झोनमध्ये विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पुरूष विद्युत सहाय्यकांबरोबर महिला वायरवूमनची नियुक्ती करण्यात आली. दहावी नंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात त्यांनी ‘इलेक्ट्रीशन’चे प्रशिक्षण पूर्ण करून महावितरणच्या ‘विद्युत सहाय्यक पदावर २९ महिला कार्यरत आहेत.रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेले आहेत. विजेचे जाळे पसरलेले आहे. कोकणात पाऊसही मोठ्या प्रमाणावर होतो. डिस्क इन्स्युलेटर,पीन इन्स्युलेटर फुटली किंवा तारेचे घर्षण होऊन वीजपुरवठा बंद पडणे, वाहिनीवर झाड किंंवा झाडाची फांदी कोसळून वीज पुरवठा बंद पडणे अशा कारणांमुळे वीजपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असतो. किंबहुना पोलवर चढून ती समस्या दूर करावी लागते. संबंधित समस्या रात्री - अपरात्री किंवा तीनही ऋतूमध्ये सोडविणे कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाण ठेवून महिला विद्युत सहाय्यक कार्यरत आहेत. सन २०१३मध्ये महिला विद्युत सहाय्यकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना विविध उपकेंद्रात काही दिवस सेवा प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना त्यातील अडथळे, समस्या व धोका याची माहिती देण्यात आली. तद्नंतर पोलवर चढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टप्प्याटप्प्याने कार्यालयीन कामकाज, वीजमीटर तपासणे, दुरूस्ती करणे, किंवा ग्राहकांना देणे शिवाय जनमित्रांसमवेत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आज वायरवुमन विजेच्या खांबावर चढून दुरूस्ती करत आहेत. काही वायरवुमनची तर आॅपरेटर्सपदी नियुक्ती झाली आहे. वास्तविकरित्या आव्हानात्मक काम या भगिनींनी स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)1इलेक्ट्रिकचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती.2 विजेच्या खांबावर चढून वायरवुमन करत आहेत वीज दुरूस्ती.3 विजेच्या बाबतीत ‘दया, माया, शांती, क्षमा’ याला थारा नसल्याने अवघड काम.