शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

चाटव येथे रस्त्याचे काम पाडले बंद

By admin | Updated: March 3, 2015 22:17 IST

नियमबाह्य काम : ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

खेड : खेड तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. विशेषत: वरवली ते चाटव दरम्यान रस्त्याची झालेली वाताहात थांबवण्यासाठी या कामाला हिरवा कंदिल मिळाला, मात्र ठेकेदाराने हे काम पूर्णपणे नियमबाह्यरित्या केल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात आला आहे. रस्त्यावर कोटींग न करताच न थेट डांबर टाकल्याने हा रस्ता आता वादात सापडला आहे. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सूचना देत अखेर हे काम बंद पाडले आहे़ या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे़मार्च २०१४मध्ये वरवली ते चाटव या रस्त्याचे कामाला मंजुरी मिळाली होती. दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४० लाख रूपये मंजूर झाले आहेत. या कामाची मुदत जून २०१४मध्ये संपली होती. या रस्त्याची पुरती वाताहत झाल्याने हे काम तातडीने होणे आवश्यक होते. ठेकेदार व्ही. एन. पवार यांनी हे काम घेतले आहे. ६ महिन्यामध्ये ठेकेदाराने केवळ ५९ मीटर रस्त्यावर खडी पसरवून काम बंद केले.याबाबत आंबवली व परिसरातील काही सरपंच आणि ग्रामस्थ तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना याबाबत जाब विचारला होता. यावेळी परिस्थिती पाहून ठेकेदाराने हे बंद असलेले काम २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा सुरू केले. हे काम करताना रस्त्यावरील साफसफाई केली नाही. टेकिंग कोट न करताच खडी पसरवली.याबाबत संतापलेल्या विजय कदम यांनी ठेकेदार पवार यांना विचारताच पवार यांनी उद्दामपणे उत्तरे दिली. कदम यांचा अवमान केल्याने वातावरण काहीसे तापले. यावेळी ठेकेदाराने काणेतेही कोटींग न करताच मातीतच डांबरीकरण सुरू केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.या रस्त्याचे काम पाहण्यासाठी ग्रामस्थ आले असता, त्यांच्यासमोरच पवार यांनी डांबरीकरणाचे काम सुरू केले़ अखेर या रस्त्याची पाहणी करण्यास आलेल्या आंबवली, हुंबरी, वाडीबीड, सणघर, वरवली आणि नांदीवली येथील संतापलेल्या ग्रामस्थांनी मात्र हे काम रोखून धरले. यावेळी या कामाची प्रत तपासावी आणि ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.याशिवाय आंबवली ते वरवली या ४०० मीटर अंतरावरील झालेल्या १० लाख रूपये किंमतीच्या रस्ता डांबरीकरण काम वाहून गेल्याने या कामाचीही चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निस्तुरे यांनी या ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी संयमी भूमिका घेतल्याची माहिती चाटव आणि वरवली येथील ग्रामस्थांनी दिली आहे. (प्रतिनिधी)