शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बारकोड नोंदीनंतरच दाखल्यावर सही

By admin | Updated: May 22, 2015 00:15 IST

सुशांत खांडेकर : महसूल खात्याला आली जाग

राजापूर : तीन महिन्यांपूर्वी राजापुरात खळबळ उडवून देणाऱ्या जातीच्या बनावट दाखल्याच्या प्रकरणानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बारकोडची आॅनलाईन नोंद झाल्याशिवाय दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाणार नाही, असा निर्णय प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे सेतू कार्यालयातून वितरित होणाऱ्या दाखल्यांच्या रजिस्टरचीही नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचे खांडेकर यांनी म्हटले आहे. राजापुरातील महा - ई सेवा केंद्रातून जातीच्या बनावट दाखल्याचे वितरण करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणामुळे महसूल खात्यावर टीकेची चौफेर झोड उठली होती. महसूल खात्याच्या कारभाराचा हा पंचनामाच असल्याच्या प्रतिक्रियाही तालुकाभरातून व्यक्त होत होत्या. तीन महिन्यानंतर का होईना महसूल प्रशासनाने यातून बोध घेतला आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पावले उचलली आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होताच महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल. या प्रवेशासाठी विविध दाखले आवश्यक असतात. त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येही विविध दाखल्यांची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर सेतू व महा-ई सेवा केंद्रामध्ये आतापासूनच गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी खांडेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आॅनलाईन नोंद केलेल्या दाखल्यावर बारकोड नसेल तर अशा दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. सेतू कार्यालयातून वितरीत होणाऱ्या दाखल्यांची नोंदणीनिहाय तपासणी केल्यानंतरच या दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाईल, असे खांडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता तरी बनावट दाखल्यांची प्रकरणे थांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी).