शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 17:26 IST

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल मिळाला. तहसिल कार्यालयात आज, मतमोजणी पार पडली.

सावंतवाडी : तालुक्यात पार पडलेल्या चार ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा निकाल संमिश्र लागला. बांदा ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत राजाराम सावंत तर सांगेली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे श्रीधर लाड विजयी झाले. निरवडेत हरी वारंग व देवसू. दाणोलीत किसन सावंत यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. येथील तहसिल कार्यालयात आज, मतमोजणी पार पडली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तालुक्यातील तब्बल पंधरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी सात ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती जमातीच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. तर तीन बिनविरोध करण्यात आल्या होत्या. यातील बांदा, सांगेली, देवसू दाणोली, निरवडे ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम पार पडला. यात चारही ग्रामपंचायतीत एकुण १६२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज, बुधवारी सकाळी येथील तहसिल कार्यालयात मोजणीत झाली. यात  एकमेव बांदा ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत राजाराम सावंत ३३२ मते घेऊन विजयी झाले त्याच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडी पुरस्कृत समिर पेळपकर यांना १२३ मते पडली 7 जणांनी नोटाला मतदान केले आहे.सांगेली ग्रामपंचायतीत महाविकासचे श्रीधर लाड यांना २२५ मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी भाजप पुरस्कृत अशोक मेस्त्री यांना १४८ मते मिळाली. याठिकाणी ९ जणांनी नोटाचा पर्याय निवडला. देवसू दाणोली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत किसन सावंत हे १२१ मते घेऊन विजयी झाले, त्याच्या विरोधात असलेल्या धोंडीराम जंगले यांना ६८ मते पडली तर ३ जणांनी नोटाचा पर्याय निवडला. निरवडे येथील पोटनिवडणूकीत सर्वाधिक जास्त मतदान झाले होते. यात हरी वारंग हे ३६४ मते घेऊन विजयी झाले असून त्याच्या विरोधात असलेल्या दत्‍ताराम गावडे यांना २१२ मते पडली तर १३ जणांनी नोटाचा पर्याय निवडला होता याठिकाणी झालेला विजय हा गाव विकास पॅनेलचा विजय असल्याचे जेष्ठ गावप्रमुख सदा गावडे यांनी सांगितले आहे.मतमोजणीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकाल स्पष्ट झाल्यानंतर विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक