शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडवा; अबीद नाईक, काका कुडाळकरांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली मागणी

By सुधीर राणे | Updated: August 11, 2023 16:39 IST

लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले

कणकवली: गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे महंमदवाडी टाळंबा व इतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. ते तत्काळ सोडवावेत. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी राज्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल  पाटील यांच्याकडे केली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.दरम्यान, त्याअनुषंगाने लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, चिटणीस बाप्पा सावंत, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर, ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, सूरज परब आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील नरडवे येथील महंमदवाडी धरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. याठिकाणी पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. तसेच टाळंबा धरणाच्या पुनर्वसनाबाबतच्या समस्या प्रलंबित आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत देण्याच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.यावेळी मंत्री पाटील व आमदार तटकरे यांनी या हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. तसेच अतिवृष्टीतील नुकसानीचा अहवाल मागवून घेऊन देय असलेली सर्व भरपाई तातडीने देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग