शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

‘त्या’ शिक्षकावर कारवाईचा ठराव

By admin | Updated: July 6, 2014 00:32 IST

वैभववाडी पंचायत समिती सभा : पुरस्कार वाद

वैभववाडी : पंचायत समितीने दिलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कारावरुन वाद निर्माण करुन पदाधिकारी व प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करुन बदनामीस कारणीभूत ठरलेले नावळे शाळेचे शिक्षक दिनकर केळकर यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत झाला. सभापती नासीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा झाली. सभेला उपसभापती बंड्या मांजरेकर, सदस्य मंगेश गुरव, वैशाली रावराणे, शुभांगी पवार, गटविकास अधिकारी एम. एम. जाधव, विशेषाधिकारी नाशिककर आदी उपस्थित होते. गुणवंत पुरस्कार हे पंचायत समितीने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनासाठी दिले. ते शासकीय नव्हते. असे असतानासुद्धा त्याची माहिती अधिकारात माहिती मागविणे, पुरस्कार वितरणाच्या आधी तो आपल्यालाच मिळावा असे निवड समितीला लेखी निवेदन देणे, तो पुरस्कार न मिळाल्याने अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत शंका उपस्थित करुन बदनामी करणे आणि खात्याच्या परवानगीशिवाय पत्रकबाजी करणे हे कृत्य शिक्षकांकडून कितपत योग्य आहे असा सवाल सभापती काझी यांनी उपस्थित केला. तर पुरस्कारासंबंधी वर्तमानपत्रातून पत्रकबाजी झाल्यानंतर शिक्षण खात्याने त्याबाबत खुलासा का दिला नाही असा प्रश्न उपस्थित करुन संबंधितांवर कारवाईची मागणी गुरव यांनी केली. त्यानुसार दिनकर केळकर यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा एकमुखी ठराव घेण्यात आला.शिराळे येथील शिक्षक आलदर २१ महिने सतत गैरहजर असल्याने त्यांची सेवा खंडीत करण्यासंबंधी आपण पत्र जिल्हा परिषदेला दिल्यानंतर शिक्षण विभाग संबंधितास हजर होण्याची नोटीस पाठवतो. ही शिक्षण विभागाची कार्यपद्धती चुकीची असून आलदर यांची सेवा खंडीत करुन त्यांना सेवामुक्त करण्याचे आदेश सभापती काझी यांनी दिले.शून्य टक्के निधी खर्च झालेल्या दलित वस्त्यांमध्ये समाज कल्याणचा निधी प्राधान्याने खर्च करण्याचे धोरण ठरवले. मात्र, मार्च अखेर समाजकल्याणचा निधी अखर्चित असताना पात्र प्रस्ताव नामंजूर कसा झाला अशी विचारणा मंगेश गुरव यांनी केली. त्यावर विस्तार अधिकारी कांबळे यांनी सदरचा प्रस्ताव आचारसंहितेत आल्याचे स्पष्ट केले. शाळांच्या पूर्वीच्या किचनशेडचे काम अद्ययावत व परिपूर्ण होईपर्यंत नवीन कामे करु नयेत अशा सूचना सभापती काझी यांनी दिल्या. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुचवलेल्या पुरवणी आराखड्यातील १५ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे काझी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)