शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना पदावरून हटविले; पक्षाचा तडकाफडकी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:52 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांना अचानक पदावरून दूर केल्याने पक्षात उभी फूट पडली आहे. गवस समर्थकांनी शनिवारी सावंतवाडी येथे बैठकीचे आयोजन केले असून, राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरेश गवस यांना जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करत त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना पदावरून हटविले पक्षाचा तडकाफडकी निर्णय

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांना अचानक पदावरून दूर केल्याने पक्षात उभी फूट पडली आहे. गवस समर्थकांनी शनिवारी सावंतवाडी येथे बैठकीचे आयोजन केले असून, राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरेश गवस यांना जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करत त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.सुरेश गवस यांची एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या नेमणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट कमालीचा नाराज होता. हा गट पक्षापासून दूर गेला होता. यात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कणकवलीचे नगरसेवक अबीद नाईक आदींचा समावेश होता. गवस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सर्व बैठकांवर बहिष्कार घातला होता. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोणत्याच बैठकांना ते येत नव्हते.त्यातच अलीकडे वेंगुर्ले येथील तालुकाध्यक्ष पदावरून झालेला वाद असो किंवा बुथ कमिटीच्या बैठकांवरून झालेला वाद असो या सर्व बैठकांचा अहवाल पक्षनिरीक्षकांनी वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सुरेश गवस यांना बाजूला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे पत्र शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गवस यांना पाठविले असून, त्यांची नियुक्ती प्रदेश सरचिटणीस पदावर करण्यात आली आहे.

मी पक्षाच्या पडत्या काळात काम केले असून, माझ्यावर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या सर्व समर्थकांनी शनिवारी सावंतवाडी येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आम्ही पक्षाचे राजीनामे देणार असून, पक्षात काम करण्यास आम्ही इच्छुक नसल्याचे कळविणार असल्याचेही गवस यांनी सांगितले आहे.जिल्हाध्यक्षपदासाठी प्रवीण भोसले इच्छुकसिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कार्याध्यक्ष म्हणून अबीद नाईक इच्छुक असल्याचे सांगितले जात असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या दोन नावांचा पक्ष विचार करू शकतो, असे सांगण्यात येत आहे. दोन नावांना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचीही पसंंती असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग