शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी दोडामार्गमधील उर्वरित १० गावे इको सेन्सिटिव्ह यादीत - स्टॅलिन दयानंद

By अनंत खं.जाधव | Updated: April 16, 2024 16:45 IST

२५ गावाबाबत निर्णय जाहीर, ३२ मायनिंग प्रकल्प बंद होणार: शेतकऱ्यांकडून सत्कार

सावंतवाडी : दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावे “इको सेन्सेटिव्ह झोन” म्हणून जाहीर करण्यात आली आहेत आता उर्वरित १० गावे ही इनोव्हेटिव्ह म्हणून जाहीर करा त्यामुळे ३२ हून अधिक मायनिंग प्रकल्प बंद होणार आहेत.असा विश्वास वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केला.आपण अर्धी लढाई जिंकली आहे. पण न्यायालयाच्या निर्णया ची सरकारकडून योग्य ती अमलबजावणी होत नसल्यानेच   शेकडो एकर जमिनीत वृक्षतोड सुरू असा दावा ही दयानंद यांनी केला. १४ वर्षांच्या लढाईला यश मिळाल्याने तसेच सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 25 गावे सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत स्टॅलिन दयानंद यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदिप सावंत, नंदकुमार पवार अस्मीता एम के यांच्यासह दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.दयानंद म्हणाले, जो काही विजय मिळाला आहे तो ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मिळाला आहे. त्यामुळे यापुढे ही अशाच प्रकारे एकत्र राहणे गरजेचे आहे. जमिनी न विकता या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा जेणे करुन मायनिंगसाठी जमिनी विकून पैसा मिळणार नाही तितका पैसा पर्यटनातून मिळू शकतो, असा त्यांनी दावा केला. त्याच बरोबर आमची लढाई यापुढे सुध्दा चालू राहणार आहे. आत्ता आम्ही जिल्हाधिकारी आणि वनअधिकार्‍यांच्या विरोधात आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत.सावंत म्हणाले, या ठिकाणी वनविभाग आणि जिल्हा प्रशासन जिल्ह्यात असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत सतर्क नाही. वाघाच्या नोंदी असलेले अनेक वर्षाचे रेकॉर्ड वनविभागाच्या कस्टडी मधून चोरीला गेले आहे. त्यामुळे हा प्रकार जाणीवपुर्वक झाला की केला गेला? याची माहिती घेणे महत्वाचे ठरणार आहे.परुळेकर म्हणाले, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र, या ३ राज्यात तब्बल ५० वाघ असल्याचा दावा याबाबत अभ्यास करणार्‍या सामाजिक संस्थांनी केला आहे असे असताना शासनाकडुन ही माहिती लपविली जाते हे दुदैवे आहे, असा आरोप त्यांनी केला. अर्धी लढाई आम्ही जिंकलो आहोत. त्यामुळे येणार्‍या काळात येथील जमिनी विकल्या जाणार नाहीत. त्याच बरोबर प्रदुषणकारी प्रकल्प येणार नाहीत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट महत्वाचीसावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील अनेक ग्रामस्थ हे पद्रूषण कारी प्रकल्पाच्या विरोधात आहेत या ग्रामस्थांकडून मोठी साथ मिळाली त्यामुळे यावर अभ्यास करून अनेक मुद्दे न्यायालयात ठळक पणे मांडता आले त्याचेच हे यश असल्याचे स्टॅलिन दयानंद म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग