शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आरामबस झाडावर आदळून २९ जखमी

By admin | Updated: December 20, 2015 00:42 IST

सहा गंभीर : चिपळुणातील आगवेनजीक घटना

सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी पहाटे साडेचार वाजता आगवेनजीक धोकादायक वळणावर रानटी डुकरांच्या कळपाला वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला. मात्र, त्याचवेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी झाडावर जोरदार आदळली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील सहाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. चिपळूण तालुक्यातील आगवेनजीक हा अपघात झाला. मुंबई येथील नाईक ट्रॅव्हल्स कंपनीची व्होल्व्हो आरामबस (एमएच-०७-एफ-८८००) गोव्याच्या दिशेने प्रवासी वाहतूक करीत होती. बोरीवलीहून ही गाडी रात्री नऊला सुटली होती. चालक अमित नारायण मेस्त्री (वय २७, कुडाळ) हा गाडी चालवीत होता. चिपळूण तालुक्यातील आगवेनजीक गाडी आली असता दाट धुके असल्याने व या वळणावर अचानक डुकरांचा कळप रस्त्यावर आल्याने त्यांना वाचविण्यासाठी ब्रेक दाबल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याच्या डाव्या बाजूला सरकून झाडावर जोरदार आदळली. पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक मोठा आवाज झाला. यामध्ये अनेकांचे हात-पाय व कंबर यांना दुखापत झाली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ दाखल झाल्याने जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून डेरवण वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये २८ प्रवासी व चालकाचा समावेश आहे. सर्व प्रवासी ख्रिसमस सणानिमित्त ग्रुपने सहलीसाठी गोव्याकडे निघाले होते. सुदैवाने येथील बीएसएनएल कंपनीने खणलेल्या खड्ड्यात बस पडली नाही. तसे झाले असते तर बस उलटली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती. अपघातातील सहा प्रवासी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. यामध्ये आदित्य चंद्रशेखर (२७), सौम्या हरिदास (२७), सूरज सांतरम (२७), नारायण गुजर (३३), मुनपेली ज्योती (३२), मनोजकुमार जयस्वाल (२८) यांचा समावेश आहे. सुषमा गणपत पुजारे (२८), गायत्री संतोष राणे (३९), अश्विनी विक्रम धनावडे (२८), ममताव अनिलकुमार गोल (२३), दीपाली सचिन पवार (३०), तेजस राजगोपाल (२५), अमित विष्णू मेस्त्री (२६), रितेश सुरेंद्रकुमार झा (३०), मैजुबुन रेहमान (३७), बेनझीद सुरय्या (२९), झैनाब रेहमान (१२), अनुज जयस्वाल (३२), आन्या रायजादा (७), प्रियांका श्रीवास्तव जयस्वाल (३२), अनशू श्रीवास्तव (२८), वत्सला कर्नम (२३), सोमनाथ भट्टाचार्य (२६), शीतल प्रजेश (३०), प्रजेश कालिदास (३०), अमिषा बुझ (२३), सलोन जॉन (३०), स्नेहलता प्रेमनाथ बटाले (५१), स्वाती सानाप (२६) हे किरकोळ जखमी झाले आहेत. (वार्ताहर)