शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी नगरपरिषदेने केलेले पुनर्वसन वादात, व्यावसायिकांमध्ये वादाची ठिणगी

By अनंत खं.जाधव | Updated: October 3, 2023 18:06 IST

सावंतवाडी : एकाच कुटुंबातील सदस्यांनी एका पेक्षा अधिक जागा अडविल्याने सावंतवाडी नगर पालिकेने व्यावसायिकांना दिलेल्या नव्या जागा या वादात ...

सावंतवाडी : एकाच कुटुंबातील सदस्यांनी एका पेक्षा अधिक जागा अडविल्याने सावंतवाडी नगर पालिकेने व्यावसायिकांना दिलेल्या नव्या जागा या वादात सापडल्या असून विक्रेत्यामध्येच वाद निर्माण होऊ लागल्याचे दिसून येत आहेत.यावरुन आज, मंगळवारी सकाळी विक्रेत्यांच्या काही गटात वाद झाले. यावेळी पोलिसांना ही पाचारण करण्यात आले. परंतु आमच्या पेक्षा तुम्ही पालिका प्रशासनाशी संपर्क साधून जागेचा तिढा सोडवा, अशा सुचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.येथील नगर पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईत असलेले फुल, फळ विक्रेते अन्य इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या परिसरात असलेल्या पर्यायी जागेत गेले आहेत. परंतु काही व्यावसायिकांच्या कुटुंबियांनी एका पेक्षा अनेक जागा अडविल्या आहेत. काही विक्रेत्यांना जागा मिळालेल्या नाहीत त्यामुळे नाराजी पसरली आहे. यावरुन वाद उभे राहिले आहेत. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांना बोलविण्यात आले. मात्र जागा ठरवून देण्याबाबत किंवा कोणाला किती जागा द्यावी याचा निर्णय नगर पालिकेचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन यावर तोडगा काढण्यात यावा, अशा सुचना पोलिसांनी व्यावसायिकांना दिल्या.काही व्यावसायिकांना व्यवस्थित जागा न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर आहे. वर छप्पर नसल्यामुळे काही जण नाराज आहेत तर काही जण बसतात त्या ठिकाणी विद्युत जनित्र असल्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता पालिका प्रशासनाने याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी व्यावसायिकांतून होत आहे. दरम्यान हा वाद नगर पालिकेत पोहचला असून सर्व व्यावसायिकांकडून माहिती घेतली जाईल असे नगर पालिकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी