शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : टर्मिनस कि मिनी टर्मिनस दर्जाबाबत सांशकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:13 IST

सावंतवाडीला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला की ते मिनी टर्मिनस आहे. हे मात्र कोकण रेल्वेने गुलदस्त्यातच ठेवले आहे. यांचे उत्तर मात्र दिले नाही. चार दिवसापूर्वी सावंतवाडीत आलेले केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कान टोचल्यानंतर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठळक मुद्देटर्मिनस कि मिनी टर्मिनस दर्जाबाबत सांशकता, सुरेश प्रभू यांनी कान टोचताच रेल्वेकडून माहिती टर्मिनसवर साडे सोळा कोटी खर्च केल्याचा दावा, लोकमत ने उठवला होता आवाज

सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसबाबत लोकमतने आवाज उठवताच कोकण रेल्वे जागी झाली असून, टर्मिनसचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा कोकण रेल्वेने केला आहे. तसेच या कामावर साडेसोळा कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सावंतवाडीला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला की ते मिनी टर्मिनस आहे. हे मात्र कोकण रेल्वेने गुलदस्त्यातच ठेवले आहे. यांचे उत्तर मात्र दिले नाही. चार दिवसापूर्वी सावंतवाडीत आलेले केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कान टोचल्यानंतर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.पंधरा दिवसापूर्वी लोकमतने कोकण रेल्वेच्या समस्या तसेच सावंतवाडी टर्मिनसची अवस्था यावर मालिका सुरू केली होती. या मालिकेची दखल खुद्द सावंतवाडीत आलेल्या केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी ही घेतली होती.त्यानंतर त्यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाºयांशी संपर्क करत सावंतवाडी टर्मिनसची माहीती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कोकण रेल्वे च्या अधिकाºयांनी माहीती दिली असून यात सावंतवाडी टर्मिनसचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. यात टर्मिनसच्या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म तसेच टर्मिनसला जोडण्यासाठीही नवीन अ‍ॅडीशनल प्लॅटफॉम आदी कामे पूर्ण झाली आहेत. असा दावा कोकण रेल्वे च्या अधिकाºयांनी केला आहे.

पादचारी पुलाचे काम पूर्णया कामावर साडेसोळा कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच नवीन प्लॅटफार्मकडे जाण्याचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. ते काम लवकरच पूर्ण होणार आहे. रेल्वे उभी करण्यासाठी दोन्ही प्लॅटफार्मला जोडणारा पादचारी पुल आदी कामे आता पर्यत कोकण रेल्वे महामंडळाने पूर्ण केली आहेत. तसेच उर्वरित कामे ही पूर्ण करण्यात येणार आहेत.त्यामुळे लवकरच टर्मिनसचे काम मार्गी लागेल तसेच येथे रेल्वे च्या अन्य गाड्या थांबणार आहेत.दरम्यान सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकर पूर्ण होईल असा दावा कोकण रेल्वे करत असली तरी सावंतवाडीत टर्मिनस होणार कि मिनी टर्मिनस यांचा खुलासा अद्याप कोकण रेल्वेने केला नसून, टर्मिनस झाल्यास रेल्वेत पाणी भरण्याची सुविधा रेल्वे गाड्या धुण्यासाठी शेड आदीचे प्रयोजन अद्याप करण्यात आले नाही. मात्र सुरेश प्रभू यांनी कान टोचताच रेल्वे प्रशासनाकडून घाईगडबडीत माहीती देण्यात आली आहे. यात रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत ही माहीती देण्यात आली आहे. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्गSuresh Prabhuसुरेश प्रभू