शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सात ‘स्कुबा’ प्रशिक्षण केंद्रांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांत ७ ठिकाणी ‘स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र’ व आंबोली येथे ‘साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी शासनाने २ कोटी ४0 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांत ७ ठिकाणी ‘स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र’ व आंबोली येथे ‘साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी शासनाने २ कोटी ४0 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.किनारपट्टी भागातील भूमी पुत्रांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी शासनाने सन २0१५ पासून कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटन स्थळांचा विकास केला जात आहे. जिल्ह्याच्या पर्यटनाला आणखी चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने आंबोली येथे ‘साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ व सात ठिकाणी ‘स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र’ व्हावीत, असा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या स्कुबा सेंटरमध्ये शिरोडा-रेडी-सागरतीर्थ, सागरेश्वर-उभादांडा, निवती-भोगवे, वायरी-भूतनाथ-तारकर्ली, तोंडवली-हडी-वायंगणी, विजयदुर्ग-तिर्लोट, कुणकेश्वर-तांबळडेग या ठिकाणांचा समावेश आहे. शासनाने आता ही प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यास मान्यता दिली असून त्यासाठी २ कोटी ४0 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.यातील १0 लाख रुपयांचा निधी ‘साहसी क्रिडा प्रशिक्षण केंद्रासाठी तर उर्वरित २ कोटी ३0 लाख स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी खर्च केला जाणार आहे. ही प्रशिक्षण केंद्र मंजूर व्हावित यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली. ही प्रशिक्षण केंद्रे स्थानिकांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक स्तरावर निविदा काढण्यात येणार आहे.५0 जणांना स्कुबाचे प्रशिक्षण दिले जाणारजिल्'ात सात ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामार्फत एकूण ५0 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात ४0 जण स्कुबा डायव्हर म्हणून तर १0 त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे नियंत्रक म्हणून असणार आहेत. या सर्वांना मालवण तारकर्ली येथील इसदा संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेणारे उमेदवार त्या ठिकाणी रहावे यासाठी त्यांच्याकडून ५ वर्षाचे बंदपत्रक (करार) करून घेण्यात येणार असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली.प्रशिक्षण केंद्राची माहिती वेबसाईटवरजिल्ह्यातील नव्याने मंजूर स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र व साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची माहिती जिल्ह्यासह जगातील पर्यटकांना मिळावी यासाठी एक अधिकृत वेबसाईट (संकेतस्थळ) तयार करण्यात येत आहे. या संकेतस्थळानुसार या प्रशिक्षण केंद्राची माहिती पर्यटकांना मिळणार आहे.