शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘सी वर्ल्ड’बाबत प्रस्ताव प्राप्त

By admin | Updated: October 4, 2016 00:54 IST

उदय चौधरी : भूसंपादनाची जबाबदारी पर्यटन महामंडळाची

सिंधुदुर्गनगरी : ‘सी-वर्ल्ड’ संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून प्राप्त झाला आहे. मात्र, भूसंपादनाचे काम आपले नाही. आपण केवळ दर निश्चिती करून महामंडळाला देणार आहोत. याला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल. जागा खरेदी पर्यटन महामंडळाकडून केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली. लोकशाही दिन सोमवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते.पर्यटन महामंडळाला सूचनानवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन केले जाणार असून, यात अतिरिक्त २५ टक्के मोबदला वाढीव स्वरुपात दिला जाणार आहे. या प्रकल्पाला ग्र्रामसभा घेऊन आंदोलने करून, प्रत्यक्ष भेटून ग्रामस्थ विरोध करत आहेत. त्यांना आपण कोणतेच ठोस आश्वासन देऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रकल्पाचा आराखडा तयार केलेली संस्था, सामाजिक प्रशासन अधिकारी आणि ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ते जमीनदार यांची एकत्रित बैठक घेऊन स्थानिकांच्या शंकांचे निरसन करण्याच्या सूचना आपण एम.टी.डी.सी. ला दिल्या आहेत. लवकरच या संदर्भात बैठक होईल, असेही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी सांगितले. महामार्ग दुरुस्तीचे काम महिन्याभरातमुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गणेश चतुर्थीपूर्वी या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामही काही ठिकाणी ब्लॉक वापरून करण्यात आले होते. मात्र त्याचा प्रभावी उपयोग झाला नाही. आता पाऊस संपल्यातच जमा आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर महामार्गाचे रिकार्पेटींग करावे, अशा सक्त सूचना महामार्ग प्राधिकरणाला दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले.