शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बंडखोर उमेदवार आधीच भूमिगत?

By admin | Updated: February 12, 2017 22:35 IST

बंडाचा झेंडा फडकणार की उतरणार? : आज ठरणार निवडणूक रिंगणातून माघारीच्या आलेखाची उंची

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यावेळी शिवसेनेमध्ये ‘न भुतो न भविष्यती’ अशी बंडखोरी झाली आहे. १३ फेब्रुवारीला बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, म्हणून पक्ष नेत्यांकडून विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. आपल्यावरील दबाव व अर्ज माघार टाळण्यासाठी काही बंडखोर भूमिगत झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बंडाचा झेंडा फडकणार की खाली उतरवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यावरच माघारीच्या आलेखाची उंची ठरणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेत उमेदवारीसाठी असंख्य कार्यकर्ते इच्छुक होते. मात्र, त्या सर्वांना उमेदवारी देणे पक्षाला शक्य नव्हते. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक विद्यमान सदस्यांनाही यावेळी उमेदवारी मिळालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ता म्हणून काम करूनही त्याची पक्षाने दखल घेतली नाही, असेही अनेक कार्यकर्ते जिल्ह्यात आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेतील इच्छुकांनीच मोठ्या प्रमाणात बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेतील इच्छुकांचे बंड हे केवळ अपक्ष उमेदवारी भरण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तर या बंडखोरांना भाजपने आपल्या गोटात घेऊन उमेदवारीही बहाल केली आहे. त्यामुळे भाजपला आयते उमेदवार मिळालेच त्याचबरोबर जिल्ह्याच्या विविध भागात बंडखोर उमेदवारांसह सेना कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याने पक्षाचे बळही आपोआपच वाढले आहे. या बंडखोरीचे रुपांतर पक्षांतरामध्ये झाले आहे. ज्यांना आपल्यावर अन्याय झाल्याचे वाटत होते तरीही दुसऱ्या पक्षात जायचे नव्हते किंवा ज्यांना भाजपमधून वा अन्य पक्षातून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी थेट बंडखोरी करीत सेनेच्याच उमेदवारांविरोधात निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे. रत्नागिरी तालुक्यातील बंडखोरी ही नवीन-जुना या वादातून झाली आहे. सेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश लाड यांनी नाचणे जिल्हा परिषद गटातून अपक्ष तर नाचणे गणातून भाजपतर्फे अर्ज दाखल केला आहे. हरचेरी गटामध्ये सेनेच्या विनया गावडे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड करीत कॉँग्रेसमधून उमेदवारी दाखल केली आहे. गोळप गटातही सेनेमध्ये बंडखोरी झाली आहे. कर्ला गणात सेनेचे नदीम सोलकर यांनी बंड केले. त्यांनी ५ फेब्रुवारीला सेनेचा राजीनामा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्याकडे सोपवला आहे. सोलकर यांनी स्थानिक पातळीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत आता सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दक्षिण रत्नागिरीतील लांजा, राजापूर व संगमेश्वरमध्येही सेनेत बंडखोरी झाली असून, तेथील काही बंडखोर ‘नॉट रिचेबल’ आहेत. संगमेश्वरमधील सेनेचे राजेश मुकादम यांनी बंडखोरी केली असून, ते सेनेच्या उमेदवार रचना महाडिक यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मुकादम हे माघार घेण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण रत्नागिरीपेक्षाही उत्तर रत्नागिरीत यावेळी शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी व गीते-कदम गटात जोरदार चकमकी झडत असून, बंडखोरी केलेल्या अनेक इच्छुकांनी भाजपमधून अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल झाले आहेत. बंडखोरांची समजूत काढण्याचे नेत्यांचे प्रयत्न असफल ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे १३ फेब्रुवारीला बंडखोर निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची शक्यता धूसर झाली आहे. दुसरीकडे चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी बंड करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ तर ९ पंचायत समितींच्या ११० अशा एकूण १६५ जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे.