शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जादा गाड्यांसाठी रत्नागिरी सज्ज

By admin | Updated: October 7, 2016 00:20 IST

मार्ग परिवहन महामंडळ : नऊ आगारातून १४१ गाड्यांचे नियोजन

रत्नागिरी : दीपावलीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. दीपावलीनिमित्त नऊ आगारातून मुंबई, पुणे, अक्कलकोट, मिरज, लातूर मार्गावर १४१ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रथम शैक्षणिक सत्र संपल्यानंतर शाळांना दिवाळीची दोन आठवडे सुटी मिळते. या दिवसात पर्यटकांचीही संख्या वाढते. शिवाय सुटीला मुंबई अथवा अन्य शहरात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातच पर्यटन हंगामही आता सुरु होत असल्याने कोकणात पर्यटकांचीही वर्दळ वाढणार आहे.दापोली आगारातून कल्याण, ठाणे, मुंबई, भार्इंदर, बोरिवली मार्गावर बारा, तर खेड आगारातून ठाणे, मुंबई, लातूर मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून सर्वाधिक ३० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, चिंचवड, परळी, लातूर, तासगाव, मिरज, बोरिवली, मुंबई, ठाणे, गोंदवले मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. गुहागर आगारातून अक्कलकोट, बोरिवली, भांडूप, विरार, स्वारगेट मार्गावर बारा गाड्या सोडण्यात येणार आहेत.देवरूख आगारातून स्वारगेट, अक्कलकोट, कोल्हापूर, स्वारगेट, कल्याण मार्गावर ९ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आगारातून २० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आंबेजोगाई, इचलकरंजी, उस्मानाबाद, इस्लामपूर, मिरज, स्वारगेट, लातूर मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.लांजा आगारातून १२ गाड्यांचे नियोजन केले असून, तुळजापूर, बोरिवली, पुणे मार्गावर या जादा गाड्या धावणार आहेत. राजापूर आगारातून २४ गाड्या सोडण्यात येणार आहे.बोरिवली, तुळजापूर, लातूर, आंबेजोगाई, शिर्डी, सोलापूर मार्गावर गाड्या धावणार आहेत. मंडणगड आगारातून १४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, नालासोपारा, मुंबई, कल्याण, स्वारगेट, कोल्हापूर, उस्मानाबाद मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत.आषाढी एकादशीला शेतीच्या कामामुळे कोकणातील भाविक वारीला जात नाहीत. परंतु कार्तिकी एकादशीला कोकणातून काही ठिकाणांहून वारी निघते. शिवाय सुटीमुळे पंढरपूरला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. अक्कलकोटला भाविक जात असल्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणात विदर्भातील मोठा कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. सुटीत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असून, थेट गाड्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आली दीपावली... : कोकणात येणार लाखो लोकदीपावलीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर कोकणात येतात. त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही रत्नागिरी एस. टी. विभाग दीपावलीसाठी सज्ज झाला आहे. यंदा विविध मार्गांवर एस. टी. १४१ जादा गाड्या सोडणार आहे.