शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

रत्नागिरी- दीड लाखापेक्षा अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना

By admin | Updated: August 26, 2014 22:51 IST

आले गणराय : घरोघरी आगमनाची जय्यत तयारी

रत्नागिरी : ‘वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ...’ अवघ्या भक्तांचे लाडके दैवत असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे आगमन दोन दिवसांवर आले आहे. जिल्हाभरात १ लाख ५९ हजार ४३६ घरगुती, तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.सुबक गणेशमूर्तींसोबत बैठकीची आरास सुंदर सजविली जाते. त्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवात विद्युत रोषणाई करण्यात येते. दीड दिवसाच्या गणेशोत्सवाबरोबर पाच दिवसांचे, सात दिवसांचे, तर अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. एस. टी. व रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांसाठी जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. बाजारपेठदेखील नटली आहे. शाळा, महाविद्यालयांचा उद्या शेवटचा दिवस असून, २८ आॅगस्टपासून गणेशोत्सवाची सुटी लागणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ९३० घरगुती, तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहेत. रत्नागिरी शहरात ७६१० घरगुती, तर २७ सार्वजनिक, ग्रामीणमध्ये ९ हजार ४३२ घरगुती, तर २ सार्वजनिक, जयगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत २७०० घरगुती, तर ६ सार्वजनिक, राजापूरमध्ये १९ हजार ८८६ घरगुती तर ६ सार्वजनिक, नाटे येथे ७ हजार २६२ घरगुती, तर २ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.लांजा येथे १३ हजार ५४० खासगी तर ५ सार्वजनिक, देवरूखमध्ये १२ हजार १८० घरगुती व ५ सार्वजनिक, सावर्डेत १० हजार २४० घरगुती व १ सार्वजनिक, चिपळूणमध्ये १२ हजार ६५० घरगुती व १३ सार्वजनिक, गुहागरमध्ये १४ हजार २२४ घरगुती व २ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. अलोरेमध्ये ५ हजार ५७४ घरगुती व ४ सार्वजनिक, खेडमध्ये १२ हजार ८९७ घरगुती व १५ सार्वजनिक, दापोलीमध्ये ६ हजार १३९ घरगुती व ७ सार्वजनिक, मंडणगडात ४ हजार २७५ घरगुती व ६ सार्वजनिक, बाणकोटमध्ये १ हजार ८७४ घरगुती व २ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)१ लाख ५९ हजार ४३६ खासगी गणेशमूर्ती.१०८ सार्वजनिक गणेश मूर्ती.एस. टी. व रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांसाठी जादा गाड्या.शाळा, महाविद्यालयांना उद्यापासून मिळणार सुटी.घरोघरी गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहुल.