शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

रत्नागिरीत घरफोड्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: May 4, 2017 00:25 IST

साळवी स्टॉपजवळ घरफोडी; सोने-चांदीचे दागिने लंपास

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी रात्री साळवी स्टॉप येथे हॉटेल सिंधुदुर्गजवळील एका गृहसंकुलात सदनिका फोडून चोरट्यांनी ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी इरत्ना विठ्ठलराव मामीलवाड (वय ५८, रा. संजय प्रभूसावंत यांचे घर, साळवी स्टॉप, रत्नागिरी, मूळ रा. आंबुलगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मामीलवाड हे ३० एप्रिल २०१७ रोजी रात्री नऊ वाजता कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते बुधवारी (दि. ३ मे) सकाळी साडेआठ वाजता बाहेरगावाहून आल्यानंतर त्यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडलेल्या स्थितीत आढळला. आतील कपाटातून सोने व चांदीचे दागिने तसेच चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना आढळून आले. पाच गॅ्रम सोन्याचे वळे, सोन्याची नथ, तसेच सुमारे एक किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती, वस्तूू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. चोरी झालेल्या वस्तूंची किंमत सुमारे ६५ हजार रुपये आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील काही दुकाने चोरट्यांनी फोडली होती. काही लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. त्यावेळचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सापडले होते. त्यावरून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. चोरीचे प्रकार वाढल्याने शहर परिसरात घरे व दुकानफोडी करणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)आरोग्यमंदिर परिसरातही घरफोड्या!साळवी स्टॉप येथील घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असला, तरी मंगळवारी रात्री शहरातील आरोग्य मंदिर परिसरातील आणखी काही ठिकाणच्या इमारतींमध्ये फ्लॅट फोडण्यात आले व बाजूच्या फ्लॅटच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलिसांत नोंद झालेली नाही.