रत्नागिरी : रत्नागिरी आगाराच्या चवेदेऊड वस्ती एस.टी. बसमध्ये प्रवासी उतरून गेल्यानंतर रात्री उशिरा वाहक झोपणार असलेल्या सीटखाली कागदामध्ये गुंडाळलेली बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. जिवाची पर्वा न करता ही वस्तू हातात घेत वाहकाने बसबाहेर धाव घेतली व संशयास्पद वस्तू एका बांधावर ठेवली. त्यानंतर रात्री १२ ते ३ या वेळेत घातपात विरोधी पथकातर्फे (बी.डी.डी.एस.) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्वान वीरू, बॉम्बशोध व नाश साहित्याच्या माध्यमातून या वस्तूची पाहणी केली असता त्यामध्ये कोणताही स्फोटक पदार्थ नसल्याचे निदर्शनास आले, असे असले तरी ही वस्तू कोणी ठेवली, याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.वाहक संदेश मांडवकर व चालक उमेश नागवेकर हे बस (एमएच २० बीएल १७२०) घेऊन काल, रविवारी पावणेतीन वाजता चवेदेऊड येथे निघाले. कोतवडेमार्गे खालगाव व चवेदेऊड करून रात्री ७.४५ वाजता चवेदेऊडला रात्री वस्तीसाठी थांबले. जेवण करून झोपी जाण्याच्या उद्देशाने वाहक मांडवकर यांनी ११ व १२ क्रमांकाची सीट काढली. सीट काढताच सीटखाली वर्तमानपत्रात गुंडाळलेली एक वस्तू आढळली. प्रवासी विसरले असतील, या उद्देशाने मांडवकर यांनी वर्तमानपत्र बाजूला केले असता अनेक वायर्स गुंडाळलेली बॉम्बसदृश वस्तू दिसली. बॉम्बसदृश वस्तू दिसताच वाहक मांडवकर व चालक नागवेकर भयभीत झाले. एस.टी.चे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी मांडवकर यानी ती वस्तू हातात पकडून पळत पळत २५ ते ३० फूट अंतरावरील एका बांधावर नेऊन ठेवली. गावातील सरपंच, पोलीसपाटील यांच्याशी संपर्क / पान ३ वर
रत्नागिरी आगाराच्या चवे देऊड वस्ती एस.टी. बसमध्ये एस.टी.त बॉम्बसदृश वस्तू
By admin | Updated: September 22, 2014 23:53 IST