शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

राणेंचा प्रवेश स्वार्थासाठी! - संदेश पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:24 IST

भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपात प्रवेश देणार नाहीत.

ठळक मुद्देत्यांच्या प्रवेशाने भाजपचा फायदा नाही

कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्वत:च्या आणि आपल्या मुलांच्या स्वार्थासाठीच  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध आहे. यासर्व बाबींचा विचार करून पक्षनेतृत्व त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी येथे केले. 

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, सरचिटणीस परशुराम झगडे, महेश सावंत आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.संदेश पारकर पुढे म्हणाले,  भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपात प्रवेश देणार नाहीत.  यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये चारवेळा पराभव झाल्याने राणेंचा जनाधार संपलेला आहे.  त्यामुळे कोणाचा तरी टेकू  मिळविण्यासाठी व मुलांच्या पुर्नवसनासाठी राणेंची धडपड सुरू आहे. २०१९ मध्ये कणकवलीत राहीलेले राणेंचे अस्तित्व विधानसभा निवडणुकीत संपेल. त्यांना पुन्हा आपला जनाधार पहायचा असेल तर  स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर ही निवडणूक लढवावी.

नारायण राणे यांनी स्वत:च कणकवली मतदार संघातून  भाजपाचा उमेदवार म्हणून नीतेश राणे यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र,  राणेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जिल्हा व राज्य भाजपा कोअर कमिटीत चर्चा करून  मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जाहीर करतील. राणेंचा २०१४ मध्ये कुडाळ आणि मुंबईत असे दोन वेळा पराभव झाला.  राणेंच्या मुलाचा २०१४ आणि २०१९ मध्ये पराभव झाला. राणेंचे चार पराभव झाले आहेत. त्यामुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे. यामुळेच राणेंना भाजपात घेऊन फायदा होणार नाही.  उलट राणेंना फायदा होईल.  राणे स्वत:च मी भाजपात प्रवेश करणार अशा बातम्या पसरवून निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा एकसंघ आहे. जिल्ह्यातील भाजपा वाढविण्यासाठी संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण,  विनोद तावडे, आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तसेच अन्य पदाधिकाºयांनी  फार मेहनत घेतली आहे. जिल्ह्यात भाजपा संघटना मजबूत आहे.

राणे १९९० मध्ये जिल्ह्यात आल्यानंतर मुंबईतील गुंड आणून दहशत पसरवायचे. कालांतराने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाच गुंड बनविल्याने अनेक जणांना कारावास झाला आहे. त्याला जबाबदार कोण? त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे हे सर्व पाहाता  भाजपात त्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यांचा प्रवेश होणार असता तर यापूर्वीच झाला असता, असाटोलाही संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.राणेंची सर्वच पक्षांवर टीका

नारायण राणे आतापर्यंत ज्या पक्षात गेले तेथील पक्ष नेतृत्वावर त्यांनी  टीका केली आहे. शिवसेना, काँग्रेस या पक्षात असताना त्यांनी टीका केली. तर भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झाल्यावरही त्यांनी विश्वास यात्रा काढत भाजपवर टीका केली, असेही पारकर म्हणाले.

 

टॅग्स :konkanकोकणNarayan Raneनारायण राणे