शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

सरकारचे ‘बुरे दिन’ आणणार : राणे

By admin | Updated: July 10, 2015 01:09 IST

काँग्रेसचा भव्य मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, हजारोंची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : पंधरा दिवस उपाशी ठेवून बिर्याणी समोर ठेवल्यावर तुटून पडावे, तसे सगळे मंत्री सत्तेवर तुटून पडले आहेत. ‘एमआयडीसी’च्या पैशांवर मुख्यमंत्र्यांची परदेशात ऐश चालू आहे. जिल्ह्याचा विकास होऊ नये म्हणून भाजपचे मंत्री केंद्रात बसून कटकारस्थान करतात. त्यात गोव्यातील मंत्र्यांचा हात आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या या सरकारचे ‘बुरे दिन’ आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे सरकार पाडण्यासाठी सज्ज असून राज्यभर दौरा करणार आहे, असा एल्गार माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे गुरुवारी काँग्रेसच्या मोर्च्याला संबोधित करताना केला. राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूकबळी, मंत्र्यांच्या खोट्या पदव्या, कोकणातील ठप्प झालेली विकासकामे, भ्रष्टाचार व गगनाला भिडलेली महागाई या विरोधात गुरुवारी काँग्रेसच्यावतीने नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेच्या युती सरकारला जाग आणण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी भवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मधुसुदन बांदिवडेकर, जिल्हा परिषद विषय समिती सभापती अंकुश जाधव, स्नेहलता चोरगे, संजय बोंबडी, गुरुनाथ पेडणेकर, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, विकास कुडाळकर, प्रमोद कामत, नासीर काझी, एकनाथ नाडकर्णी, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत यांच्यासह हजारो कार्यकर्ते, शेतकरी, महिलावर्ग उपस्थित होता.यावेळी राणे म्हणाले, मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर सिंधुदुर्गची ओळख निर्माण झाली होती. सर्वच क्षेत्रांत सिंधुदुर्ग आघाडीवर होता. मात्र, गेल्या सात ते आठ महिन्यांत जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. याला सर्वस्वी युती सरकार जबाबदार आहे. जिल्ह्यासाठी सी-वर्ल्ड आणला. मात्र, मालवणी माणसांनी त्या ‘सी’चा वेगळाच अर्थ घेतला. त्याचप्रमाणे चिपी विमानतळ, रेडी बंदर, चौपदरीकरण, पाटबंधारे प्रकल्प ही सर्व विकासकामे निधीअभावी ठप्प आहेत. मी केलेल्या कामांचे उद्घाटन करून पालकमंत्री श्रेय लाटत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील होऊ घातलेले प्रकल्प पूर्ण करावेत, अन्यथा त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी नारायण राणे यांनी दिला. (प्रतिनिधीवेळ येताच सर्व प्रकरणे बाहेर काढूभ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र म्हणणाऱ्यांची आज अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. महिला व बालविकास विभागाकडून झालेला भ्रष्टाचार, शिक्षण खात्यात होणारा भ्रष्टाचार अशाप्रकारे आता मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर पडू लागले आहेत. काँग्रेसला नौटंकी म्हणणाऱ्या काळसेकरांनी हे लक्षात घ्यावे की, स्मृती इराणी, विनोद तावडे यासारख्या नेत्यांची बोगस पदवी, ललित मोदींशी संबंधित असलेले भाजपचे मंत्री याला नौटंकी म्हणत नाहीत का? असे सांगत काळसेकर यांचा खरपूस समाचार घेतला. वेळ येताच पुराव्यानिशी सर्व प्रकरणे बाहेर काढू, असा इशाराही दिला.अधोगती थांबविण्यास काँग्रेस कटिबद्धजिल्ह्याचा विकास युती सरकाने खुंटून टाकला आहे. यापुढे जिल्ह्याच्या विकासावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही. जिल्ह्याची अधोगती थांबविण्यास काँग्रेस कटिबद्ध असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.दुपारी साडेबाराच्या सुमारास ओरोस येथील रवळनाथ मंदिर येथून मोेर्चा निघाला. हजारोंच्या उपस्थितीत युती सरकारच्या विरोधात विविध घोषणा देत सारी सिंधुदुर्गनगरी दुमदुमून सोडत मोर्चा अखेर जिल्हाधिकारी भवनासमोर दाखल झाला. त्यानंतर काँग्रेस नेते यांनी युती सरकारवर हल्लाबोल केला.)