शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

निधी खर्च करण्यात राणे आघाडीवर, जठार पिछाडीवर

By admin | Updated: July 25, 2014 22:52 IST

राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर निधी खर्च करण्यात दुसऱ्या क्रमांकावर

सिंधुदुर्गनगरी : विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदारांना एका वर्षात दोन कोटी रूपयांचा निधी स्थानिक विकास कार्यक्रमातून आमदार निधी म्हणून शासनाकडून दिला जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत तीन आमदारांचे मिळून ६ कोटी रूपये मिळत आहेत. विशेष म्हणजे गेल्या २०१३-१४ या आर्थिक वर्षात पालकमंत्री नारायण राणे हे हा निधी खर्च करण्यात आघाडीवर असून भाजपचे आमदार प्रमोद जठार सर्वात पिछाडीवर राहिले आहेत. सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर निधी खर्च करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.पालकमंत्री नारायण राणे हे कुडाळ-मालवण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २ कोटी २४ लाख रूपये खर्चाची ६० कामे सुचवली होती. या कामांना मंजुरी देऊन नियोजन विभागाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी वर्ग केला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे १ कोटी १९ लाख, सार्वजनिक बांधकाम ६८ लाख, पाणी पुरवठा विभागाकडे ३० लाख, नियोजन विभागाकडे पर्यटनविषयक कामे करण्यासाठी २ लाख आणि मालवण शहरातील विकासकामांसाठी ४ लाख रूपये इतकी तरतूद करण्यात आली होती. १ कोटी ७२ लाखांपैकी १ कोटी ७१ लाख एवढा निधी खर्च झाला आहे. प्रगतीपथावर असलेल्या कामांसाठीही सुमारे १ लाख रूपये खर्च होत असल्याचे नियोजन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे राणे आपला जास्तीत जास्त आमदार निधी खर्च करण्यात यशस्वी ठरले आहे.आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या आपल्या मतदारसंघातून तीन तालुक्यांमध्ये ९० कामे सुचवली होती. या ९० कामांसाठी २ कोटी २ लाख रूपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. १ कोटी ४१ लाख रूपये निधी संबंधित खात्यांकडे जमा करण्यात आला होता. यातील १ कोटी २० लाखाचा निधी खर्च झाला आहे. यातून ६५ कामे पूर्ण झाली आहेत. त्यांनी सुचविलेली २२ कामे प्रगतीपथावर असून त्यावर ३० लाख रुपये खर्च झाला आहे. अजूनही ५० लाख रुपये खर्च व्हायचा आहे. आमदार प्रमोद जठार यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीचा खर्च मात्र फारसा समाधानकारक दिसत नाही. त्यांनी २ कोटी ३१ लाख रुपयांची ८० कामे सुचवली होती. १ कोटी ५४ लाख रुपये संबंधित विभागांना वर्ग करण्यात आले होते. त्यातील ३१ मार्चपर्यंत ३५ लाख ४९ हजार इतकाच खर्च झाला आहे. यातून ४२ कामे पूर्ण झाली आहेत. प्रगतीपथावर २२ कामे असून त्यावर ५३ हजार रूपये खर्च झालेले दाखविण्यात आले आहेत. म्हणजेच जठार यांचा गेल्या आर्थिक वर्षातील तब्बल १ कोटी ७५ लाख रूपये इतका खर्च व्हायचा आहे. जठार हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून या मतदारसंघात कणकवली, वैभववाडी, देवगड हे तालुके येतात. या तालुक्यांमधील विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम ९७ लाख, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे १४ लाख, पाणीपुरवठा विभागाकडे ५ लाख, माध्यमिक शिक्षणाधिकारी विभागाकडे २१ लाख आणि नियोजन विभागाकडे ८ लाखाचा निधी वर्ग करण्यात आला आहे.सर्वच विभागांवर खर्चआमदार दीपक केसरकर यांनी २ कोटी २ लाखांची कामे सुचवली असून त्यामध्ये पाणीपुरवठा विभागावर २९ लाख, कृषी विभागावर २ लाख, पर्यटन विकासावर १३ लाख, क्रीडा विभागावर ४ लाख, शासकीय रूग्णालयामध्ये २१ लाख, शिक्षण विभागावर ४९ लाख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामांवर १ कोटी २६ लाख इतका निधी तरतूद करण्यात आला होता. केसरकर यांचा निधी सर्वच विभागावर खर्च केल्याचे दिसते. (प्रतिनिधी)