शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

संधी देऊनही राणेंनी विकास केला नाहीप्रमोद जठार :

By admin | Updated: August 17, 2014 22:33 IST

शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ मेळाव्यात टीका

शिरगांव : जनतेने २५ वर्षे संधी देऊनही पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही. आता त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा करायच्या, अशी टीका आमदार प्रमोद जठार यांनी शिरगांव येथील मेळाव्यात केली.शिरगांव आंबेखोल येथे शिरगांव जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा १६ आॅगस्ट रोजी झाला. यावेळी आमदार जठार बोलत होते. ते म्हणाले, कचऱ्याचे साम्राज्य सर्वांनी पाहिले, मात्र साम्राज्याचा झालेला कचरा जिल्हावासियांनी पाहिला आहे. नारायण राणेंवर जनतेने प्रेम केले. २०-२५ वर्षे संधी दिली. विविध मंत्रीपदे, खासदारकी मिळाली, पण विकास करू शकले नाहीत. विकासात ते नापास झालेत. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत भगवा फडकणार याची सर्वप्रथम चाहूल नारायण राणेंनाच लागली. याची कबुली त्यांनी आपल्या राजीनामानाट्यात बोलूनही दाखवली, अशी टीका जठार यांनी यावेळी केली. आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले, इकोसेन्सिटिव्ह काँग्रेसने लादली. चिरे म्हणजे बॉक्साईट नव्हे, हे पटवून दिले. सत्तेत असताना अधिस्थगन उठवू न शकलेले पालकमंत्री आता पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे सांगत आहेत. नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री करुन नराचा नारायण केला. लोकसभेतील निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने ते सर्वांवर टीका करत आहेत.नेत्याला जनतेचा कळवळा असायला हवा. सत्ता ही रोजी रोटीसाठी नाही. जनतेला सर्व खरं खोट कळते. त्याचेच उत्तर निकालात मिळते, अशीही टीका जठार यांनी यावेळी केली.शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मेळाव्यास जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, पंचायत समिती सदस्य संतोष किंजवडेकर, देवगड तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले, उपाध्यक्ष राजेंद्र शेटये, सरचिटणीस संजय बांबुळकर, जिल्हा परिषद गटप्रमुख संतोषकुमार फाटक, माजी तालुका सरचिटणीस मंगेश लोके, राजाराम राणे, ग्रामपंचायत सदस्या अपूर्वा तावडे, दिगंबर तावडे, अमोल लोके, सयाजी पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)