शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रामेश्वर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By admin | Updated: February 18, 2015 00:46 IST

विजयदुर्ग येथील यात्रा : देवस्थान कमिटीच्यावतीने चोख व्यवस्था

पुरळ : विजयदुर्ग येथील रामेश्वर यात्रेला महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळपासूनच रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. देवगड तालुक्यातील रामेश्वरभक्तांनी या यात्रेला मोठी उपस्थिती लावली होती. रामेश्वराच्या पिंडीवर अभिषेक तसेच नवस बोलणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमांना सकाळपासूनच मंदिरामध्ये सुरुवात झाली. रामेश्वर दर्शनासाठी आलेल्या भक्तांना व्यवस्थित दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी देवस्थान कमिटीच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती. रामेश्वरवाडी येथील युवा संघाच्यावतीने व्यवस्थित रांगा लावून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठीही विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गंभीर व पोलीस स्टाफ तसेच तंटामुक्ती समित्यांचे अध्यक्ष, पोलीस पाटील, रामेश्वर मंदिराची उत्सव समिती कार्यरत होती. प्रसिद्ध मालवणी खाजा, कलिंगड, भाजीपाला, निरनिराळ्या प्रकारची खेळणी, हॉटेल्स, कोल्ड्रींक्स आदींनी ही यात्रा भरलेली दिसून आली. सायंकाळी सहानंतर गर्दीचा ओघ वाढला. रात्री उशिरा रामेश्वरची पालखी निघेपर्यंत यात्रेकरूंची गर्दी दिसून आली. कोटकामते येथील श्री देवी भगवती दशावतारी नाट्यमंडळाने यात्रेच्या पहिल्या दिवसापासून या मंदिरात धार्मिक तमाशाचे खेळ चालू केले आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम होत असल्याने या जीर्णोद्धारासाठी भाविकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन जीर्णोद्धार समितीने केले आहे. बुधवारी यंदाच्या यात्रोत्सवातील शेवटचा दिवस असल्याने यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. (वार्ताहर)