शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोकम बियांपासून बनविल्या राख्या, मालवण पंचायत समितीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:18 IST

निसर्गाचा समतोल राखणे हे आपले कर्तव्य आहे. निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत. याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा, झाडे वाढावीत या उद्देशाने कोकमच्या बी पासून राखी ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी दिली.

ठळक मुद्देकोकम बियांपासून बनविल्या राख्या, मालवण पंचायत समितीचा उपक्रममहिला कर्मचाऱ्यांना राख्या देऊन शुभारंभ

मालवण : निसर्गाचा समतोल राखणे हे आपले कर्तव्य आहे. निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत. याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा, झाडे वाढावीत या उद्देशाने कोकमच्या बी पासून राखी ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी दिली.नेहमीच अभिनव उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण पंचायत समितीने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने पर्यावरण समृद्ध करण्याच्या उद्देशाने कोकमच्या बी पासून राखी बनविणे हा उपक्रम राबविला आहे. सभापती पाताडे, उपसभापती परुळेकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम सत्यात उतरणार आहे. पंचायत समितीमध्ये सर्व सदस्यांच्या उपस्थितीत महिला कर्मचाऱ्यांना या राख्या देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.कोकमच्या (रतांबा) बिया असलेल्या राख्या पंचायत समिती महिला कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनला बांधलेली राखी तुटली तर अथवा काही दिवसांनी काढून आपण टाकून देतो.

मात्र, कोकम बी चिकटवलेली राखी आजूबाजूच्या परिसरात टाकल्यास अथवा योग्य जागी पुरून ठेवल्यास त्यातून कोकमाचे उत्पादन देणारी झाडे त्या परिसरात उगवतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. मालवणातील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी करवंटीपासून इको फ्रेंडली राख्या बनविल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaksha Bandhanरक्षाबंधनsindhudurgसिंधुदुर्ग