शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजन वराडकर- गणेश कुशेंचे  उपोषण सुरूच, तब्येत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 17:31 IST

नगरपरिषद समोर उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी छेडलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू राहिले. मंगळवारी सकाळी नगरसेवक गणेश कुशे यांची तब्येत काहीशी बिघडली तर सायंकाळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचीही तब्येत खालावली.

ठळक मुद्देराजन वराडकर- गणेश कुशेंचे  उपोषण सुरूच उपोषणकर्त्यांची  तब्येत खालावली

मालवण : नगरपरिषद समोर उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी छेडलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू राहिले. मंगळवारी सकाळी नगरसेवक गणेश कुशे यांची तब्येत काहीशी बिघडली तर सायंकाळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचीही तब्येत खालावली.दरम्यान, वराडकर यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले असता वराडकर यांनी नकार दिला. आम्ही मालवण नगरपरिषदेच्या मनमानी गैरकारभाराबाबत छेडलेले उपोषण हे सुरूच ठेवणार असल्याचे कुशे व वराडकर यांनी स्पष्ट केले.मालवण नगरपरिषद भाजी मार्केट गाळा क्रमांक १ (१) तत्काळ खाली करून तो पाडावा. सुजाता उमेश केणी यांना स्वतंत्र वीज मीटर घेण्याकरिता स्वतंत्र घर नंबर घेण्यात यावा. स्विमिंग पूल व ट्रेंनिग सेंटर बाबतचे कृ. सी. दे. शिक्षण संस्थेने दिलेले पत्र जाणीवपूर्वक गहाळ केले गेले, ते पत्र संस्थेकडून मागून नमूद मुद्यांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, सफाई कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार तत्काळ देण्यात यावेत, भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराने वेळोवेळी मुदतवाढ घेऊनही काम पूर्ण करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केलेली आहे. त्यावर कडक कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच त्याने सादर केलेली कोणतीही देयके अदा करण्यात येऊ नये, या प्रमुख मागण्या उपोषणकर्ते वराडकर व कुशे यांच्या आहेत. त्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत.नागरिकांचा उपोषणाला पाठींबाउपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासन अथवा सत्ताधारी कोणीही उपोषणस्थळी येण्याची तत्परता दाखवली नाही. किंबहुना आम्ही उपस्थित केलेले मागणी मुद्दे योग्यच आहे हे त्यांना माहिती असल्याने प्रशासन अथवा सत्ताधारी यांची उपोषणस्थळी सामोरे येण्याची धमक नाही, असे वराडकर यांनी सांगितले. जनतेने आमच्या उपोषणस्थळी भेटी दिल्या. उपोषणाचे मुद्दे योग्य असल्याचे नागरिकांनी सांगत अनेकांनी लेखी स्वरूपात आमच्या उपोषणास पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे, असे वराडकर व कुशे यांनी सांगितले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMalvan police stationमालवण पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग